ETV Bharat / sports

विरूष्काच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण..विराटने केली खास पोस्ट - विराट कोहली लग्नाचा वाढदिवस

कला आणि क्रीडा विश्वातील पॉवर कपल म्हणून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी ओळखली जाते. २०१७मध्ये विराट आणि अनुष्काने इटलीमध्ये लग्न केले. या लग्नात केवळ ४२ लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. शिवाय, लग्नात कोणालाही मोबाइल फोन वापरण्यास परवानगी नव्हती.

virat kohli and anushka sharma celebrate three years of their wedding
विरूष्काच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण..विराटने केली खास पोस्ट
author img

By

Published : Dec 11, 2020, 10:59 AM IST

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाला आज तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या खास प्रसंगी विराटने आपल्या पत्नीसाठी खास इंस्टाग्राम पोस्ट केली. त्याने आपल्या लग्नाचा एक फोटो शेअर करत या फोटोला सुंदर कॅप्शन लिहिले आहे.

virat kohli and anushka sharma celebrate three years of their wedding
विराटची पोस्ट

हेही वाचा - निवृत्तीनंतर पार्थिव पटेल करणार 'हे' काम

कला आणि क्रीडा विश्वातील पॉवर कपल म्हणून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी ओळखली जाते. २०१७मध्ये विराट आणि अनुष्काने इटलीमध्ये लग्न केले. या लग्नात केवळ ४२ लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. शिवाय, लग्नात कोणालाही मोबाइल फोन वापरण्यास परवानगी नव्हती.

virat kohli and anushka sharma celebrate three years of their wedding
विरूष्काच्या लग्नाला तीन वर्षे पूर्ण

हनिमूनसाठी गाठले होते फिनलँड

इटलीमध्ये लग्नानंतर दोघेही आपल्या हनिमूनसाठी फिनलँडला गेले. लग्नानंतर भारतात परत आल्यानंतर त्यांनी रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. त्यांनी दिल्लीत आणि मुंबईत अशा दोन ठिकाणी पार्टी आयोजित केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याव्यतिरिक्त अनेक नामवंत व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले होते.

पुढच्या वर्षी जानेवारीत विराट आणि अनुष्का आपल्या पहिल्या मुलाचे स्वागत करतील. ऑगस्टमध्ये त्यांनी ही गोड बातमी शेअर करीत लिहिले होते, "आता आम्ही तीनजण झालो आहोत! जानेवारी २०२१मध्ये तो येथे येणार आहे."

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.