नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने मैदानाबाहेर एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर विराटचे ५ कोटी (५० मिलीयन) फॉलोअर्स झाले असून असा कारनामा करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे.
हेही वाचा - VIDEO: सचिनच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, क्रीडा क्षेत्रातील 'ऑस्कर'ने सन्मान
क्रिकेटच्या मैदानावर अनेक विक्रम प्रस्थापित करणारा विराट सोशल मीडियावर चांगलाच 'अॅक्टिव्ह' असतो. ३१ वर्षीय विराटने इन्स्टाग्रामवर आत्तापर्यंत ९३० पोस्ट केल्या आहेत. विविध पोस्टमुळे त्याने जगभरातील चाहत्यांना आकर्षित केले आहे.
इतर भारतीय व्यक्तींच्या बाबतीत, बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा ४९.९ मिलीयन फॉलोअर्ससह दुसर्या स्थानावर आहे. तर दीपिका पादुकोण ४४.१ मिलीयन फॉलोअर्ससह तिसर्या स्थानावर आहे. जगभरातील नामांकित व्यक्तींचा आढावा घ्यायचा झाला तर, फुटबॉलस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो या क्रमवारीत आघाडीवर आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर २०० मिलीयन फॉलोअर्स झाले आहे.
सध्या विराट न्यूझीलंडविरूद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करत आहे. २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत यजमान संघाशी दोन होत करणार आहे.