नवी दिल्ली - कला आणि क्रीडा विश्वातील 'पॉवर कपल' म्हणून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी ओळखली जाते. सोशल मीडियामध्येही त्यांच्या पोस्टची चर्चा मोठ्या प्रमाणावर रंगते. या दोघांची अशीच एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सध्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून या व्हायरसच्या खबरदारीसंदर्भात विरूष्काने एक 'मंत्र' आपल्या चाहत्यांना दिला आहे.
-
Stay Home. Stay Safe. Stay Healthy. 🙏🏻 pic.twitter.com/UNMi2xQbbz
— Anushka Sharma (@AnushkaSharma) March 20, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Stay Home. Stay Safe. Stay Healthy. 🙏🏻 pic.twitter.com/UNMi2xQbbz
— Anushka Sharma (@AnushkaSharma) March 20, 2020Stay Home. Stay Safe. Stay Healthy. 🙏🏻 pic.twitter.com/UNMi2xQbbz
— Anushka Sharma (@AnushkaSharma) March 20, 2020
हेही वाचा - घरात 'फिट' राहण्यासाठी अँडरसनने शोधला खास उपाय...पाहा व्हिडिओ
'आपल्याला माहित आहे की आपण सर्व वाईट काळातून जात आहोत. कोरोनासंदर्भात खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही घरी थांबलो आहोत. त्यामुळे तुम्हीही स्वत:ची आणि इतरांची काळजी घ्या. घरी थांबा आणि निरोगी राहा', असे विराट-अनुष्काने आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
विरूष्काची लव्हस्टोरी -
अनुष्का आणि विराटची लव्हस्टोरी २०१३ मध्ये सुरु झाली होती. यशाच्या शिखरावर असलेल्या अनुष्का आणि विराटला एका कंपनीने जाहिरातीसाठी एकत्र कास्ट केलं होतं. असे म्हणतात की, दोघांची मैत्री इथूनच सुरु झाली. पुढे हीच मैत्री हळूहळू प्रेमात रुपांतरित झाली. तेव्हापासून दोघांच्या नात्याविषयी चर्चा रंगू लागल्या. दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब तेव्हा झालं जेव्हा जानेवारी 2014 मध्ये साऊथ आफ्रिका दौरा संपवून विराट एअरपोर्टवरुन थेट अनुष्काच्या घरी गेला. डिसेंबर 2017 मध्ये अनुष्काने विराटसोबत लग्नगाठ बांधली आणि आपल्या नात्याबद्दलच्या सर्व वृत्तांना दुजोरा दिला.