ETV Bharat / sports

'मुंबई'च्या खेळाडूने झारखंडकडून ठोकले ११ षटकार!

author img

By

Published : Feb 21, 2021, 7:57 AM IST

Updated : Feb 21, 2021, 1:10 PM IST

नाणेफेक जिंकून मध्यप्रदेशने झारखंडला फलंदाजीचे निमंत्रण दिले. इशानने ९४ चेंडूत १७३ धावांची खेळी साकारली. यात त्याने तब्बल १९ चौकार आणि ११ षटकार ठोकले.

इशान किशन
इशान किशन

इंदूर - क्रिकेटच्या 'छोट्या' प्रकारातील 'मोठा' खेळाडू असलेल्या इशान किशनने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत दमदार सुरुवात केली आहे. इशानने ९४ चेंडूत १७३ धावांची खेळी साकारली. यात त्याने तब्बल १९ चौकार आणि ११ षटकार ठोकले. नेतृत्व करणाऱ्या २२ वर्षीय इशानच्या खेळीमुळे झारंखडने मध्यप्रदेशसमोर ५० षटकात ४२२ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात मध्यप्रदेशचा संघ १८.४ षटकात ९८ धावांवर गुंडाळला गेला. झारखंडच्या वरुण आरोनने ३७ धावांत ६ बळी घेत विरुद्ध संघाच्या डावाला खिंडार पाडले.

नाणेफेक जिंकून मध्यप्रदेशने झारखंडला फलंदाजीचे निमंत्रण दिले. सलामीवीर इशानने कुमार कुशाग्रसोबत ११३ धावांची भागीदारी रचली. इशानने ४२ चेंडूत ५०, ७४ चेंडूत १०० आणि ८६ चेंडूत १५० धावा केल्या. तर, विराट सिंहने ६८ आणि सुमित कुमारने ५२ धावा केल्या. अष्टपैलू खेळाडू अनुकुल रॉयने ३९ चेंडूत ७२ धावांची खेळी करत संघाला ४०० धावांच्या पार पोहोचवले. इशान किशन आणि अनुकुल रॉय आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतात. भारताचा स्थानिक संघ म्हणून झारखंडची ही सर्वोच्च धावसंख्या आहे.

झारखंडचा विजय
झारखंडचा विजय

इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारतीय संघाची घोषणा केली आहे. इशान किशनला अतिरिक्त यष्टिरक्षक फलंदाज म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. आयपीएलच्या मागील हंगामात १४ सामन्यात इशानने ५१६ धावा केल्या आहेत.

हेही वाचा - आयपीएल लिलावामध्ये कोणीही लावली नाही बोली, पठ्ठ्याने ठोकले शतक!

Last Updated : Feb 21, 2021, 1:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.