ETV Bharat / sports

Vijay Hazare Trophy : गुजरातचा धुव्वा उडवत उत्तर प्रदेश अंतिम फेरीत - गुजरात वि. उत्तर प्रदेश उपांत्य सामना हायलाइट्स

विजय हजारे करंडक स्पर्धेत उत्तर प्रदेश संघाने गुजरात संघाचा उपांत्य सामन्यात ५ गडी राखून पराभव करत, अंतिम फेरीत धडक दिली आहे.

vijay-hazare-trophy-2021-uttar-pradesh-beat-gujarat-in-semi-final-by-5-wickets-and-reached-in-final-of-vijay-hazare-trophy2021
Vijay Hazare Trophy : गुजरातचा धुव्वा उडवत उत्तर प्रदेश अंतिम फेरीत
author img

By

Published : Mar 11, 2021, 5:02 PM IST

दिल्ली - विजय हजारे करंडक स्पर्धेत उत्तर प्रदेश संघाने गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत, अंतिम फेरीत धडक दिली आहे. उपांत्य सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करताना ४८.१ षटकात १८४ धावा केल्या होत्या. हा सामना उत्तर प्रदेशने ४२.४ षटकात ५ गड्याच्या मोबदल्यात सहज जिंकला.

गुजरातचा कर्णधार प्रियम पांचाळ याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय अंगलट आला. उत्तर प्रदेशच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत गुजरातला १८४ धावात रोखले. हेत पटेल याने सर्वाधिक ६० धावांची खेळी केली. तर यश दायलने उत्तर प्रदेशसाठी सर्वाधिक ३ गडी बाद केले. त्याला अकिब खानने २ गडी बाद करत चांगली साथ दिली.

गुजरातने दिलेले आव्हान उत्तर प्रदेशने सहज पूर्ण केले. अक्क्षदीप नाथ याने ७१ धावांची खेळी केली. यात त्याने ७ चौकार लगावले. तर उपेंद्र यादवने नाबाद ३१ धावा करत संघाला विजय मिळवून दिला. यूपी हा सामना ४२. ४ षटकात ५ गड्याच्या मोबदल्यात जिंकला.

हेही वाचा - IPL २०२१ : विराटच्या RCB संघाला जबर धक्का; 'या' खेळाडूची स्पर्धेतून माघार

हेही वाचा - 'भीमकाय' क्रिकेटरला पाहून सचिन म्हणाला, मला अशी शरीरयष्टी तयार करण्यास किती ऑम्लेट खावे लागतील?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.