ETV Bharat / sports

VHT २०२१ Final : मुंबईचा विजय हजारे करंडकावर कब्जा, अंतिम सामन्यात यूपीचा उडवला धुव्वा - विजय हजारे करंडक २०२१ निकाल न्यूज

मुंबई संघाने उत्तर प्रदेशचा अंतिम सामन्यात ६ गडी राखून धुव्वा उडवत विजय हजारे करंडक जिंकला.

vijay hazare trophy 2021 final : mumbai beat Uttar Pradesh by 6 wickets
VHT २०२१ Final : मुंबईचा विजय हजारे करंडकावर कब्जा, अंतिम सामन्यात यूपीचा उडवला धुव्वा
author img

By

Published : Mar 14, 2021, 4:39 PM IST

Updated : Mar 14, 2021, 5:09 PM IST

दिल्ली - मुंबई संघाने उत्तर प्रदेशचा अंतिम सामन्यात ६ गडी राखून धुव्वा उडवत विजय हजारे करंडक जिंकला. यूपीने सलामीवीर माधव कौशिकच्या नाबाद १५८ धावांच्या खेळीच्या जोरावर, मुंबईला विजयासाठी ३१३ धावांचे आव्हान दिले होते. मधल्या फळीतील आदित्य तरेचे नाबाद शतक (११८) आणि कर्णधार पृथ्वी शॉची आक्रमक अर्धशतकी (७३) खेळी याच्या जोरावर मुंबईने हा सामना ४१.१ षटकात ४ गड्याच्या मोबदल्यात जिंकला. मुंबईचे हे चौथे विजेतेपद ठरले.

अंतिम सामन्यात यूपीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ४ बाद ३१२ धावांचा डोंगर उभा केला. माधव कौशिक याने १५६ चेंडूंत १५ चौकार व ४ षटकारासह १५८ धावा केल्या. यानंतर समर्थ सिंग (५५) आणि अक्षदीप नाथ (५५) यांच्या अर्धशतकाने उत्तर प्रदेशला मोठी धावसंख्या उभरता आली. मुंबईकडून तनुषने सर्वाधिक २ गडी बाद केले. तर प्रशांत सोळंकीने एक गडी टिपला.

उत्तर प्रदेशने विजयासाठी दिलेल्या ३१३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना, पृथ्वी शॉ आणि यशस्वी जैस्वाल या दोघांनी ९.१ षटकात ८९ धावांची तुफांनी सलामी दिली. शिवम मावीने शॉला बाद करत मुंबईला पहिला धक्का दिला. शॉने ३९ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह ७३ धावांची खेळी केली. यानंतर यशस्वी २९ धावांवर बाद झाला. तेव्हा यष्टीरक्षक फलंदाज आदित्य तरेने शम्स मुलानीसोबत तिसऱ्या गड्यासाठी ८८ धावांची भागिदारी करत विजयाचा पाया रचला.

यश दायलने मुलानीला (३६) बाद केले. यानंतर तरेने शिवम दुबेसोबत जोडी जमवत संघाला विजया समीप नेलं. यादरम्यान, तरेने आपले शतक पूर्ण केले. दुबे (४२) समीर चौधरीच्या गोलंदाजीवर बाद झाला. तेव्हा तरेने सर्फराज खानच्या साथीने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तरेने १०७ चेंडूत १८ चौकारांसह नाबाद ११८ धावांची खेळी केली.

हेही वाचा - एकदिवसीय क्रिकेटवर मिताली 'राज', अशी कामगिरी करणारी जगातील पहिली खेळाडू

हेही वाचा - IND Vs ENG २nd T0-२० : फलंदाजीत सुधारणेसह मालिकेत बरोबरी साधण्याचे भारतापुढे आव्हान

Last Updated : Mar 14, 2021, 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.