व्हिक्टोरिया - ऑस्ट्रेलियाचे व्हिक्टोरिया पोलिस मॅच फिक्सिंग रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा शोध घेत आहेत. हे रॅकेट चालवणाऱ्यांमध्ये एका भारतीय व्यक्तीचे नाव समोर आले आहे. या व्यक्तीचा समावेश बीसीसीआयच्या काळ्या यादीमध्येही झाला असून हे प्रकरण टेनिसचे आंतरराष्ट्रीय सामने निश्चित करण्यासंबंधित आहे.
रवींदर दांडीवाल हे या भारतीय व्यक्तीचे नाव हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचे व्हिक्टोरिया पोलिसांचे म्हणणे आहे. दांडीवाल हा चंदीगडजवळील मोहालीचा रहिवासी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दांडीवाल हा बीसीसीआयच्या नजरेत होता.
शनिवारी एका ऑस्ट्रेलियन वृत्तपत्राने व्हिक्टोरिया पोलिसांच्या संदर्भात एक बातमी प्रसिद्ध केली. मॅच फिक्सिंगचा सूत्रधार म्हणून रवींदर दांडीवाल यांचे वर्णन पोलिसांनी केले आहे. टेनिसमध्ये खालच्या क्रमवारीत असणाऱ्या खेळाडूंना सामन्यावर सट्टा लाावण्यास दांडीवाल सांगत असे.
क्रिकेट लीगच्या वर्तुळातही दांडीवालचे नाव प्रसिद्ध आहे. एकदा त्याने हरियाणामध्येही खासगी लीग आयोजित केली होती. मात्र, बीसीसीआयने आपल्या सर्व नोंदणीकृत खेळाडूंना या लीगमध्ये भाग घेऊ नये, असा सल्ला दिला होता.