मुंबई - भारतीय संघाचा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती फिटनेस टेस्टमध्ये दुसऱ्यांदा नापास झाला आहे. त्यामुळे शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेला त्याला मुकावं लागण्याची दाट शक्यता आहे.
आयपीएल २०२० मध्ये शानदार कामगिरी नोंदवल्याने वरुणची निवड ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात करण्यात आली होती. पण त्याच्या खांद्याला दुखापत झाली आणि तो या दौऱ्याला मुकला.
वरुणवर बंगळुरूच्या राष्ट्रीय अकादमीमध्ये उपचार सुरू होते. उपचाराअंती तो बरा झाला. यामुळे त्याची निवड इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात करण्यात आली. पण त्याआधी त्याला यो-यो चाचणी बंधनकारक करण्यात आली होती. या चाचणीत तो पास झाला तरच त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे उघडले जाणार होते. पण यो-यो चाचणी दोनदा पास करण्यात त्याला अपयश आले. ज्यामध्ये त्याला दोन किमी पळावं लागणार होतं. मात्र यात तो नापास झाला.
दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी वरुण चक्रवर्तीच्या जागी राहुल चहरचा समावेश भारतीय संघात होऊ शकतो. दुसरीकडे राहुल तेवतिया अहमदबादमध्ये भारतीय संघासोबत ट्रेनिंग करत आहे. तो आपल्या दुसऱ्या फिटनेस टेस्टची वाट पाहत आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. हे पाचही सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. १२, १४, १६, १८ आणि २० मार्चला हे सामने होतील. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजल्यापासून सामन्यांचे प्रक्षेपण सुरू होईल.
- भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.
- इंग्लंडचा संघ -
- इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलींग, जोस बटलर, सॅम कुरन, टॉम कुरन, ख्रिस जॉर्डन, लाएम प्लंकेट, डेवीड मलान, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिसे टॉप्ली, मार्क वूड, जॅक बॉल आणि मॅट पर्किसन.
हेही वाचा - टी-२० रॅकिंगमध्ये टीम इंडियाची उडी; ICC ने जारी केली ताजी क्रमवारी
हेही वाचा - भारतीय महिला क्रिकेटपटूंचा मास्टर चित्रपटातील गाण्यावर डान्स, व्हिडिओ तुफान व्हायरल