दिल्ली - भारत आणि ऑस्ट्रेलियात ५ वा एकदिवसीय सामना दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर सुरू आहे. यात पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज उस्मान ख्वाजा याने कांगारूंना ठोस सुरूवात करून देत दमदार शतक ठोकले. या शतकासह त्याने काही विक्रम मोडीत काढले.
उस्मान ख्वाजाने एका द्वीपक्षीय मालिकेत भारतात खेळताना २ शतके ठोकली. अशी कामगिरी करणारा तो जगातला पहिला खेळाडू ठरला. तसेच भारतीय संघाविरुद्ध खेळताना त्यांच्याच भूमित एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक विक्रम करण्याचा पराक्रमही त्याने केला आहे.
ख्वाजाने याबाबतीत दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्सचा विक्रम मोडीत काढला. डिव्हिलियर्सने २०१५ साली भारतीय संघाविरुद्ध खेळताना ३५८ धावा केल्या होत्या.