मेलबर्न - ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या बिग बॅश लीगचा हंगाम अखेरच्या टप्प्यात पोहोचला आहे. रविवारी ब्रिस्बेन हिट आणि सिडनी थंडर यांच्यात नॉकआऊट सामना झाला. या सामन्यात सिडनी थंडरचा खेळाडू उस्मान ख्वाजाने भरमैदानात पँट उतरवली.
झाले असे की, कॅनबराच्या ओव्हल मैदानात ब्रिस्बेन हिट आणि सिडनी थंडर यांच्यात सामना रंगला होता. सिडनी थंडरने या सामन्यात प्रथम फलंदाजी केली. सिडनी थंडरकडून अॅलेक्स हेल आणि उस्मान ख्वाजा हे दोघे सलामीला उतरले. आठ षटकांचा खेळ झाल्यानंतर उस्मान ख्वाजाने आपली पँट उतरवली.
सामन्याच्या नवव्या षटकामध्ये ख्वाजा आपले पॅड, शूज आणि पँट काढून चड्डी निट करू लागला. यामुळे खेळ काही काळासाठी रोखण्यात आला. ख्वाजाच्या या कृतीमुळे विरोधी संघाच्या खेळाडूंसह प्रेक्षकही अवाक झाले. त्यानंतर खेळाडू, प्रेक्षक आणि समालोचक यांनाही हसू आवरले नाही.
-
Have ... have you ever seen this before 😂
— 7Cricket (@7Cricket) January 31, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Usman Khawaja had to change everything - on the field! 🙈#BBL10 pic.twitter.com/XOKsXkhLVS
">Have ... have you ever seen this before 😂
— 7Cricket (@7Cricket) January 31, 2021
Usman Khawaja had to change everything - on the field! 🙈#BBL10 pic.twitter.com/XOKsXkhLVSHave ... have you ever seen this before 😂
— 7Cricket (@7Cricket) January 31, 2021
Usman Khawaja had to change everything - on the field! 🙈#BBL10 pic.twitter.com/XOKsXkhLVS
सर्व काही सावरल्यानंतर ख्वाजाने पुन्हा पँट घातली आणि मग खेळ सुरु झाला. दरम्यान, नॉकआऊट सामन्यात ब्रिस्बेन हिटने सिडनी थंडरचा पराभव केला आणि अंतिम फेरीत जाण्याच्या आशा कायम राखल्या. सिडनी थंडरने दिलेले 159 धावांचे आव्हान ब्रिस्बेन हिटने 3 गड्यांच्या मोबदल्यात अखेरच्या षटकात पूर्ण केले.
हेही वाचा - IND vs ENG : पहिल्या सामन्यासाठी वसिम जाफरने निवडला संघ; पाहा कोणाला दिली संधी
हेही वाचा - इंग्लंडला कमी लेखण्याची चूक करू नका, भारतीय माजी क्रिकेटपटूची टीम इंडियाला ताकीद