मुंबई - मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) मान्यतेने होणाऱ्या मुंबई टी-२० लीगच्या दुसऱ्या मोसमाचे आयोजन १४ ते २९ मे दरम्यान करण्यात येणार आहे. २०१९ च्या मोसमात या लीगमध्ये २ नवीन संघ सहभागी आहेत. यासाठी अर्जही मागवण्यात आल्याची माहिती एमसीएने दिली आहे.
दोन नवीन संघ आल्यानंतर या मुंबई टी-२० लीगमध्ये सहभागी होणाऱ्या संघांची एकूण संख्या ८ होणार आहे. लीगमधील सामने हे मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. गेल्या मोसमात नाईट मुंबई उत्तर पूर्व संघाला जेतेपद पटकावण्यात यश आले होते.
-
What's God's Plan for next month? 🤔
— T20 Mumbai (@T20Mumbai) April 17, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Listen to @sachin_rt reveal it himself. Don't miss it. 🙌🏼#CricketChaRaja #EkdumMumbai pic.twitter.com/8rzHIX7TmA
">What's God's Plan for next month? 🤔
— T20 Mumbai (@T20Mumbai) April 17, 2019
Listen to @sachin_rt reveal it himself. Don't miss it. 🙌🏼#CricketChaRaja #EkdumMumbai pic.twitter.com/8rzHIX7TmAWhat's God's Plan for next month? 🤔
— T20 Mumbai (@T20Mumbai) April 17, 2019
Listen to @sachin_rt reveal it himself. Don't miss it. 🙌🏼#CricketChaRaja #EkdumMumbai pic.twitter.com/8rzHIX7TmA
लीगच्या पहिल्या मोसमात ६ संघांचा समावेश करण्यात आला होता. यात स्थानिक युवा क्रिकेटपटूंनी चांगली कामगिरी करत आपली चमख दाखवली होती. शिवम दुबेला 'प्लेयर ऑफ द सीरिज'ने गौरविण्यात आले होते.