मुंबई - आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. याआधी खेळाडूंसह स्टाप कर्मचाऱ्यांना एक आठवडा क्वारंटाइन बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक संघातील खेळाडू आपापल्या संघाच्या सराव सत्रात भाग घेण्यासाठी रवाना होत आहेत.
कोलकाता नाइट रायडर्सचा स्फोटक खेळाडू आद्रें रसेल आणि सुनिल नरेन हे भारतात पोहोचले आहेत. दोघे वेस्ट इंडिजवरुन मुंबईत दाखल झाले आहेत. ते पुढील आठवडाभर क्वारंटाइन राहतील.
-
The moment you've all been waiting for...
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 23, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The 2018 and 2019 MVP's are in the house! 🤩#ToofaniFans, excited to get this party started? @Russell12A @SunilPNarine74 #KKR #HaiTaiyaar #IPL2021 pic.twitter.com/SWaw3FCKPi
">The moment you've all been waiting for...
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 23, 2021
The 2018 and 2019 MVP's are in the house! 🤩#ToofaniFans, excited to get this party started? @Russell12A @SunilPNarine74 #KKR #HaiTaiyaar #IPL2021 pic.twitter.com/SWaw3FCKPiThe moment you've all been waiting for...
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 23, 2021
The 2018 and 2019 MVP's are in the house! 🤩#ToofaniFans, excited to get this party started? @Russell12A @SunilPNarine74 #KKR #HaiTaiyaar #IPL2021 pic.twitter.com/SWaw3FCKPi
दरम्यान, कोलकाताचे काही खेळाडू रविवारी मुंबईत दाखल झाले आहेत. यात वरुण चक्रवर्ती, राहुल त्रिपाठी, कमलेश नागरकोटी, संदीप वॉरियर, वैभव अरोडा, दिनेश कार्तिकचा समावेश आहे.
केकेआरचे प्रशिक्षक अभिषेक नायर, सहाय्यक गोलंदाजी प्रशिक्षक ओमकार साळवी आणि सहकारी स्टाप देखील मुंबईत दाखल झाले आहेत.
केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गन इंग्लंड संघासोबत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका संपल्यानंतर तो केकेआरच्या संघासोबत जोडला जाणार आहे.
हेही वाचा - IND VS ENG १st ODI : टीम इंडियाला जबर धक्का, रोहित पाठोपाठ श्रेयसला दुखापत
हेही वाचा - Ind vs Eng १st ODI : भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय, कृणाल-कृष्णा पदार्पणात चमकले