नवी दिल्ली - लेंडल सिमन्स आणि डॅरेन ब्राव्होच्या शानदार फलंदाजीमुळे त्रिनबागो नाइट रायडर्सने (टीकेआर) पुन्हा एकदा कॅरेबियन प्रीमियम लीगचे (सीपीएल) विजेतेपद जिंकले आहे. २०१५, २०१७ आणि २०१८ नंतर टीकेआरचे हे चौथे सीपीएल विजेतेपद आहे. यंदाच्या सीपीएलच्या हंगामात टीकेआरने सर्व दहा सामने जिंकले. मुंबईचा अनुभवी लेगस्पिनर प्रवीण टीकेआरकडून खेळतो. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) खेळणारा तांबे हा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे.
-
HERO CPL CHAMPIONS 2020! TRINBAGO KNIGHT RIDERS!!! #CPL20 #CricketPlayedLouder #CPLFinal pic.twitter.com/0d5CwkxyBj
— CPL T20 (@CPL) September 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">HERO CPL CHAMPIONS 2020! TRINBAGO KNIGHT RIDERS!!! #CPL20 #CricketPlayedLouder #CPLFinal pic.twitter.com/0d5CwkxyBj
— CPL T20 (@CPL) September 10, 2020HERO CPL CHAMPIONS 2020! TRINBAGO KNIGHT RIDERS!!! #CPL20 #CricketPlayedLouder #CPLFinal pic.twitter.com/0d5CwkxyBj
— CPL T20 (@CPL) September 10, 2020
सेंट लुसिया झोक्सविरुद्धच्या अंतिम सामन्यात टीकेआरने १८.१ षटकांत ८ गडी राखून १५५ धावांचे लक्ष्य पूर्ण करत चौथ्यांदा कॅरेबियन प्रीमियम लीगचा विजेता होण्याचा मान मिळवला. अंतिम सामना ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर गुरुवारी खेळवण्यात आला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना डॅरेन सॅमीचा संघ सर्वबाद झाला. झोक्सकडून यष्टीरक्षक फलंदाज आंद्रे फ्लेचरने सर्वाधिक ३९ धावा केल्या. टीकेआरकडून कर्णधार कायरन पोलार्डने ४ बळी मिळवले. त्यानंतर मैदानात आलेला टीकेआरचा सलामीवीर लेंडल सिमन्सने ८४ धावांची खेळी करून आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. डॅरेन ब्राव्होने ५८ धावांची अर्धशतकी खेळी साकारली.
सिमन्सला त्याच्या जबरदस्त खेळीसाठी सामनावीर, तर कर्णधार पोलार्डला संपूर्ण स्पर्धेतील अष्टपैलू कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
-
Another monster knock 💪🏿 from @54simmo helps TKR cruise to the Championship victory. What a monumental night for Simmons who scripted his personal #CPLHistory alongside the #Champions! 💫 pic.twitter.com/wN3z48aOmL
— Trinbago Knight Riders (@TKRiders) September 10, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Another monster knock 💪🏿 from @54simmo helps TKR cruise to the Championship victory. What a monumental night for Simmons who scripted his personal #CPLHistory alongside the #Champions! 💫 pic.twitter.com/wN3z48aOmL
— Trinbago Knight Riders (@TKRiders) September 10, 2020Another monster knock 💪🏿 from @54simmo helps TKR cruise to the Championship victory. What a monumental night for Simmons who scripted his personal #CPLHistory alongside the #Champions! 💫 pic.twitter.com/wN3z48aOmL
— Trinbago Knight Riders (@TKRiders) September 10, 2020