वेलिंग्टन - भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे. यात दुखापतीतून सावरलेल्या ट्रेंट बोल्टचे न्यूझीलंडच्या संघात पुनरागमन झाले आहे. तर मिशेल सॅटरन या फिरकीपटूला संघातून डच्चू देण्यात आलं आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरूवातीला ५ सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात आली. या मालिकेत भारताने ५-० ने निर्भेळ यश मिळवले. यानंतर तीन एकदिवसीय सामन्याची मालिका पार पडली. न्यूझीलंडने या मालिकेत भारताला ३-० ने व्हाईटवॉश देत टी-२० मालिकेतील बदला घेतला. दरम्यान, आता उभय संघात २ सामन्याची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. यातील पहिल्या सामन्याला २१ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.
न्यूझीलंडने कसोटी मालिकेसाठी आपला संघ जाहीर केला. यात ट्रेंट बोल्टचे पुनरागमन झाले आहे. बोल्ट दुखापतीमुळे संघाबाहेर होता. आता तो यातून सावरल्यानंतर भारताविरुद्ध पुनरागमन करणार आहे.
-
Test cricket is back this week! The first Test against India starts on Friday at the @BasinReserve #NZvIND https://t.co/4UCsZBO1vi
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Test cricket is back this week! The first Test against India starts on Friday at the @BasinReserve #NZvIND https://t.co/4UCsZBO1vi
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 16, 2020Test cricket is back this week! The first Test against India starts on Friday at the @BasinReserve #NZvIND https://t.co/4UCsZBO1vi
— BLACKCAPS (@BLACKCAPS) February 16, 2020
असा आहे भारताचा कसोटी संघ -
- विराट कोहली (कर्णधार), मयांक अगरवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा, ऋषभ पंत, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि इशांत शर्मा.
असा आहे न्यूझीलंडचा कसोटी संघ -
- केन विल्यम्सन (कर्णधार), टॉम ब्लन्डेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डे ग्रॅंडहोम, काईल जेमिसन, टॉम लॅथम, डेरी मिशेल, हेन्री निकोलस, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, निल वॅगनर आणि बीजे वॉलटिंग.
हेही वाचा -
टीम इंडिया ऑस्ट्रेलियात खेळणार डे-नाईट कसोटी
हेही वाचा -
पुलवामा हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पाक संघ येणार भारतात, मोदी सरकारकडून व्हिसा मंजूर