ETV Bharat / sports

ODI मध्ये सर्वाधिक सामने गमावणारे संघ, पाक तिसऱ्या स्थानी तर टीम इंडिया 'या' स्थानावर

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर भारतीय संघाच्या नावे एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने गमावणारा संघ ठरला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने गमावणारे पहिले पाच संघ कोणते आहेत. ते वाचा...

top 5 teams to lose most match in odi cricket
ODI मध्ये सर्वाधिक सामने हरणारे संघ, पाक तिसऱ्या स्थानी तर टीम इंडिया 'या' स्थानावर
author img

By

Published : Feb 6, 2020, 2:18 PM IST

Updated : Feb 6, 2020, 8:01 PM IST

मुंबई - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडने या मालिकेतील पहिला सामना ४ गडी राखून जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. भारतीय संघाने दिलेले ३४८ धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने ४८.१ षटकात ६ गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. रॉस टेलरने नाबाद १०९ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्याला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. पराभवानंतर भारतीय संघाच्या नावे एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने गमावणारा संघ ठरला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने गमावणारे पहिले पाच संघ कोणते आहेत. ते वाचा...

न्यूझीलंड -

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने गमावणाऱ्या संघाच्या यादीत न्यूझीलंडचा पाचवा क्रमांक लागतो. न्यूझीलंडने आपला पहिला एकदिवसीय सामना ११ फेब्रुवारी १९७३ मध्ये खेळला होता. आतापर्यंत न्यूझीलंडने ७६९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी न्यूझीलंडने ३४९ सामने जिंकले तर ३७३ सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

top 5 teams to lose most match in odi cricket
न्यूझीलंडचा संघ

वेस्ट इंडीज -

दोन वेळचा विश्वविजेता वेस्ट इंडीज या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. विंडीजने आपला पहिला सामना ४ सप्टेंबर १९७३ ला खेळला होता. त्यानंतर आतापर्यंत विडींजने ८१९ सामने खेळले आहेत. यात ४०१ विजय तर ३७८ पराभवाचा समावेश आहे.

वेस्ट इंडीजचा संघ

पाकिस्तान -

१९९२ चा विश्वविजेता पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर असून पाकिस्तानने आपला पहिला सामना ११ फेब्रुवारी १९७३ ला खेळला. तेव्हापासून पाकने आतापर्यंत ९२७ सामने खेळली असून यात ४८६ विजय तर ४१३ पराभव आहेत.

पाकिस्तानचा संघ

श्रीलंका -

१९९६ चा विश्वविजेता श्रीलंका या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेने आपला पहिला सामना ७ जून १९७५ ला खेळला होता. तेव्हा पासून आजघडीपर्यंत श्रीलंकेने ८४९ सामने खेळले आहेत. यात ३८६ सामन्यात विजय तर ४२१ सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

श्रीलंकेचा संघ

भारत -

दोन वेळचा विश्वविजेता भारत या यादीत पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघाने आपला पहिला एकदिवसीय सामना १३ जुलै १९७४ ला खेळला होता. तेव्हापासून आतापर्यंत भारताने ९८५ सामने खेळले आहेत. यात भारताने ५१३ विजय मिळवले आहेत. तर ४२२ सामन्यात भारताचा पराभव झाला आहे.

भारतीय संघ

Intro:Body:

spo

Conclusion:
Last Updated : Feb 6, 2020, 8:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.