मेलबर्न - २०१९ वर्षाच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज पीटर सीडलने बीबीएल स्पर्धेत 'धोनी स्टाईल' कामगिरी नोंदवली. ३१ डिसेंबरला बिग बॅश लीग मधील सिडनी थंडर आणि अॅडलेड स्ट्रायकर्स यांच्यात झालेल्या सामन्यात सीडलने फलंदाज उस्मान ख्वाजाला न पाहताच धावबाद केले.
हेही वाचा - कोहली ठरला क्रिकबझच्या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय संघाचा कर्णधार
या रनआऊटच्या व्हिडिओमुळे सीडलचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. अॅडलेड स्ट्रायकर्सच्या सीडलने सामन्याच्या १४ व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ख्वाजाला धावबाद केले. वेस अगरने पकडलेला चेंडू नॉन-स्ट्रायकरच्या दिशेने फेकला. सीडल स्टंपजवळ उभा होता आणि स्टम्स न पाहताच त्याने चेंडूने बेल्स उडवल्या. क्रिकेटविश्वात असे धावबाद धोनीच्या नावावर जमा आहेत. त्यामुळे सीडलच्या या रनआऊटमुळे प्रेक्षकांना काही वेळासाठी धोनीची आठवण झाली.
-
P SIDDY STOP IT!
— KFC Big Bash League (@BBL) December 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
That's the cheekiest of cheeky run outs from the Strikers veteran! Khawaja out for 63 #BBL09 pic.twitter.com/28SuiDxRcL
">P SIDDY STOP IT!
— KFC Big Bash League (@BBL) December 31, 2019
That's the cheekiest of cheeky run outs from the Strikers veteran! Khawaja out for 63 #BBL09 pic.twitter.com/28SuiDxRcLP SIDDY STOP IT!
— KFC Big Bash League (@BBL) December 31, 2019
That's the cheekiest of cheeky run outs from the Strikers veteran! Khawaja out for 63 #BBL09 pic.twitter.com/28SuiDxRcL
सीडलने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्याने वयाच्या ३५ व्या वर्षी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटी लढतीपूर्वी सीडलने रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत निवृत्तीचा निर्णय जाहीर केला.
सीडलने २००८ ला मोहाली येथे झालेल्या लढतीत कसोटीमध्ये पदार्पण केले होते. त्याने आपल्या ११ वर्षाच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये ६७ कसोटी लढती खेळल्या. यात त्याने २२१ बळी घेतले. या दरम्यान एकाच डावाच पाच बळी घेण्याची कामगिरी त्याने आठ वेळा केली. यासह त्याने २० एकदिवसीय लढतींमध्ये १७ बळी घेतले आहेत.