नवी दिल्ली - वेस्ट इंडीजचा वेगवान गोलंदाज टिनो बेस्टने माजी भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडचे कौतुक केले आहे. कोट्यावधी लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतरही भारतीय खेळाडू खूप नम्र आहेत, असे तो म्हणाला.
बेस्टने एक मुलाखत दिली. तो म्हणाला, ''भारतीय संघातील सर्वजण चांगले आहेत. राहुल द्रविड त्यापैकी एक होता, जो खूप विनम्र आणि सभ्य आहे. 1.5 अब्ज लोकांचा चाहता असलेला द्रविड कधीही आपली मर्यादा सोडून वागत नाही आणि मला ते खूप आवडते. त्याच्यात कधीही वाईट गोष्ट दिसली नाही. मी नेहमीच त्याचा आदर केला.''
तो पुढे म्हणाला, "मी 2005 मध्ये प्रथम इंडियन ऑइल कपमध्ये भारताविरुद्ध खेळलो. मी द्रविडला गोलंदाजी केली आणि तो एक चांगला अनुभव ठरला. त्याने मला सलग तीन चौकार ठोकले. मला आठवते की सामन्यानंतर आम्ही चर्चा केली. त्याने मला सांगितले, की युवा खेळाडू मला तुझी उर्जा आवडते. तुला चौकार मारले पण तू थांबला नाहीस.''
युवराजने दिलेल्या बॅटचीही बेस्टने आठवण काढली आहे.