मेलबर्न - ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टिम पेनचे पाकिट त्याच्या कारमधून चोरीला गेले आहे. कोरोनामुळे पेनने स्वत: ला 'सेल्फ-आयसोलेशन'मध्ये ठेवले होते. यादरम्यान त्याने आपल्या गॅरेजचे रुपांतर व्यायामशाळेत केले. त्यामुळे त्याने आपली गाडी रस्त्यावर उभी केली होती.
'मी जेव्हा सकाळी उठलो, तेव्हा मला मोबाईलवर अकाउंटसंदर्भात हालचाली दिसल्या. मी लगेच बाहेर गेलो आणि तेव्हा मला कारचा दरवाजा उघडा पाहायला मिळाला. माझे पाकीट आणि इतर काही गोष्टी चोरीला गेल्या होत्या', असे त्याने सांगितले आहे.
ऑस्ट्रेलियाचा बांगलादेश दौरा कोरोना व्हायरसमुळे होण्याची शक्यता नाही, असे पेनने नुकतेच म्हटले होते.