मेलबर्न - ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनने डेव्हिड वॉर्नरविरूद्ध वक्तव्य केल्याबद्दल इंग्लंडच्या बेन स्टोक्सवर जोरदार हल्ला चढवला. आपल्या पुस्तकाची विक्री करण्यासाठी स्टोक्स वॉर्नरचे नाव वापरत असल्याचे पेनने म्हटले आहे.
हेही वाचा - इक्वेस्टेरियन प्रीमियर लीगच्या १० व्या पर्वात मराठमोळा आशिष लिमये चमकला
इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने आपल्या पुस्तकामध्ये डेव्हिड वॉर्नरचा उल्लेख केला आहे. यंदा झालेल्या अॅशेस मालिकेत स्टोक्सने अफलातून कामगिरी केली होती. या मालिकेदरम्यान हेडिंग्लेमध्ये खेळलेली सामनावीराची खेळी ही त्यावेळी वॉर्नरने केलेल्या स्लेजिंगचा परिणाम होती, असे स्टोक्सने आपल्या पुस्तकात म्हटले आहे. या प्रकरणावरूनच पेनने स्टोक्सला धारेवर धरले आहे.
'मी संपूर्ण वेळ स्लिपमध्ये असलेल्या वॉर्नरजवळ उभा होतो आणि सर्वाना मैदानावर बोलण्याची परवानगी आहे. पण वॉर्नर स्टोक्सला कोणत्याही प्रकारची शिवीगाळ किंवा अपशब्द बोलत नव्हता. वॉर्नरचे पुस्तक विकण्यासाठी त्याचे नाव वापरणे इंग्लंडमध्ये लोकप्रिय झाले आहे. म्हणून स्टोक्सला मी शुभेच्छा देतो. वॉर्नरने त्या संपूर्ण मालिकेत स्वत: ला चांगले हाताळले', असे पेनने स्टोक्सवर टीका करताना म्हटले आहे.