ETV Bharat / sports

१६ वर्षांपूर्वी याच दिवशी भारताने केनियाला धूळ चारत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात घेतली होती धडक

२० मार्च २००३ साली म्हणजेच बरोबर १६ वर्षापूर्वी भारताचा सेमीफायनलमधील सामना केनियाशी झाला. याच सामन्यात भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने शतक ठोकून केनियाला स्पर्धेतून बाहेर काढले.

सौरव गांगुली
author img

By

Published : Mar 20, 2019, 9:52 PM IST

मुंबई - आज जरी केनियाच्या संघाला एकदिवसीय क्रिकेटचा दर्जा नसला तरी २००३ च्या विश्वचषकात त्यांच्या दमदार कामगिरीने साऱ्याच्या भुवया उंचावल्या होत्या. कुणाला विश्वासही नव्हता की केनियाचा संघ विश्वचषकाच्या उपांत्यफेरीपर्यंत मजल मारेल. अंडरडॉग्ज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या संघाने आफ्रिकेच्या भूमिवर मोठाच उलटफेर करून दाखविला.

२० मार्च २००३ साली म्हणजेच बरोबर १६ वर्षापूर्वी भारताचा सेमीफायनलमधील सामना केनियाशी झाला. याच सामन्यात भारतीय कर्णधार सौरव गांगुलीने शतक ठोकून केनियाला स्पर्धेतून बाहेर काढले.

भारताने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करताना ४ बाद २७० धावा कुटल्या. सौरवने त्यात १११ तर सचिन तेंडुलकर यांने ८३ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात केनियाचा संघ १७९ धावांवर गडगडला. त्यात कर्णधार स्टीव्ह टिकोलो ने ५६ धावांची झुंझार खेळी केली पण संघाला विजय मिळवून देण्यात त्याला यश आले नाही.

२००३ साली केनियाचा संघ भारताचे माजी क्रिकेटपटू संदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेत उतरला होता. दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि केनिया यांनी संयुक्तरित्या विश्वचषकाचे यजमानपद स्वीकारले होते. न्यूझीलंड संघाने केनियात सुरक्षाच्या कारणावरुन खेळण्यास नकार दिला. त्यामुळे त्याचा फायदा केनियाच्या संघाला झाला.

भारत १९८३ नंतर पहिल्यांदाच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहचला होता. भारताचा अंतिम सामना २००३ साली विश्वचषकात ऑस्ट्रेलियाशी झाला. अंतिम सामन्यात कांगारुंनी भारताचा दारुण पराभव केल्याने दुसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळाले.

Intro:Body:

 This Day That Year, Indian Cricket Team Beat Kenya In Semifinal Of 2003 World Cup

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.