मुंबई - भारताचा महान माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने त्याच्या आवडत्या पाच अष्टपैलू क्रिकेटपटूंची नावे सांगितली आहेत. “मी जगातील पाच अव्वल अष्टपैलू खेळाडूंकडे पाहत मोठा झालो आहे. त्यापैकी एक मी कपिल देवबरोबर खेळलो आहे. दुसरे म्हणजे ज्याच्या विरुद्ध मी विदेशात खेळलो तो म्हणजे इम्रान खान.
सचिन पुढे म्हणाला, “माझा आवडीचा तिसरा अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणजे न्यूझीलंडचा रिचर्ड हेडली आहे. त्यानंतर मी माल्कम मार्शल आणि इयान बोथम यांच्याविरूद्धही खेळलो आहे. म्हणून हे माझे पाच आवडते अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यांना खेळताना पाहून मी मोठा आहे आणि मला त्यांच्या विरुद्ध खेळण्याची संधी मिळाली.”
सचिन तेंडुलकरने पाकिस्तानविरुद्ध १९८९ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी १९९४ साली सचिनने पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठोकले. १९९४ साली श्रीलंकेत झालेल्या सिंगर वर्ल्ड सीरीजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना सचिनने ११० धावा केल्या. या खेळीत त्याने ८ चौकार २ षटकार लगावले. १६ नोव्हेंबर २०१३ म्हणजे २४ वर्षांनी सचिनने क्रिकेटला बाय बाय केले. सचिनने २०० कसोटी सामन्यात १५९२१ धावा आणि ४६३ एकदिवसीय सामन्यात १८४२६ धावा केल्या आहेत.