लंडन - इंग्लंडचे माजी कसोटी फलंदाज जॉन एड्रिच यांचे ८३व्या वर्षी निधन झाले आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली. डावखुरा फलंदाज म्हणून ओळख असणाऱ्या एड्रिच यांनी इंग्लंडकडून ७७ सामन्यात ५००० हून अधिक धावा केल्या आहेत.
हेही वाचा - IPL मध्ये खेळणार १० संघ; BCCI च्या बैठकीत मान्यता
एड्रिच यांनी १९६३ ते १९७६ अशा कालावधीत इंग्लंडच्या क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व केले. एड्रिच कसोटीत इंग्लंडचे कर्णधारही राहिले होते. क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्या एकदिवसीय सामन्याचा ते भाग होते. विशेष म्हणजे या फॉरमॅटमध्ये पहिला चौकार ठोकण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे.
सरेकडून काऊन्टी क्रिकेट खेळणार्या एड्रिच यांनी आपल्या पहिल्या श्रेणी कारकीर्दीत ३९ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत.