मुंबई - अखिल भारतीय ज्युनियर निवड समितीने सोमवारी अफगाणिस्तानविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी १९ वयोगटाखालील भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली. २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार्या या दोन्ही संघांमधील पाच सामन्यांच्या मालिकेचे सर्व सामने लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियम-बी मैदानावर खेळले जाणार आहेत. या मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी निवड समितीने संघाची घोषणा केली आहे.
हेही वाचा - डेव्हिस चषकापूर्वी भारताला मोठा झटका, बोपण्णा बाहेर
१९ वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मुंबईतील अंधेरीच्या अथर्व अंकोलेकरलाही या संघात स्थान देण्यात आले आहे.
पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघ -
प्रियम गर्ग (कर्णधार), यशस्वी जयसवाल, तिलक वर्मा, अर्जुन आझाद, शास्वत रावत, कुमार कुशागरा (यष्टीरक्षक), दिव्यांश जोशी, मानव सुतर, रवि बिश्नोई, कार्तिक त्यागी, आकाश सिंग, अर्थव अंकोलेकर, विद्यासागर पाटिल, सीटीएल रक्षण, क्रुतिक कृष्णा.
भारत वि. अफगाणिस्तान एकदिवसीय मालिका -
- २२ नोव्हेंबर - पहिला एकदिवसीय सामना.
- २४ नोव्हेंबर - दुसरा एकदिवसीय सामना.
- २६ नोव्हेंबर - तिसरा एकदिवसीय सामना.
- २८ नोव्हेंबर - चौथा एकदिवसीय सामना.
- ३० नोव्हेंबर - पाचवा एकदिवसीय सामना.