रांची - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताने पहिले २ सामने जिंकून मालिकेत आघा़डी घेतली आहे. या मालिकेतील तिसरा सामना उद्या रांची येथे झारखंड क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारताच्या खेळाडूंनी नेट्समध्ये कसून सराव केला. उद्याचा तीसरा सामना जिंकून मालिका खिशात घालण्याच्या निर्धाराने भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या घरच्या मैदानावर म्हणजेच रांचीमध्ये होणार असल्याने, तो कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे असेल. तसेच विश्वचषकापूर्वी भारताची ही शेवटची एकदिवसीय मालिका असल्याने या मालिकेस अन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.
भारतीय संघ असा -
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायुडू, केदार जाधव, एमएस धोनी, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, विजय शंकर, के. एल. राहुल, ऋषभ पंत, सिद्धार्थ कौल आणि रविंद्र जडेजा.