मुंबई - कोरोना प्रादुर्भावाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला. अनेक मोठमोठ्या स्पर्धा कोरोनामुळे रद्द किंवा पुढे ढकलाव्या लागल्या. क्रिकेटला देखील याचा तडाखा बसला. यात ऑस्ट्रेलियामध्ये होणारी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा देखील अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. या काळात बीसीसीआयने यूएईमध्ये विनाप्रेक्षक आयपीएल स्पर्धा यशस्वी करून दाखवली. आता भारतीय संघाचे २०२१चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. वेळापत्रक पाहता भारतीय संघ संपूर्ण वर्षभर व्यग्र असणार आहे. जानेवारी ते डिसेंबर २०२१च्या काळात भारतीय संघ १४ कसोटी, १६ एकदिवसीय आणि २३ टी-२० सामने खेळणार आहे. असे आहे भारतीय संघाचे वेळापत्रक...
- जानेवारी ते मार्च – इंग्लंडचा भारत दौरा
(४ कसोटी, ४ वन-डे आणि ४ टी-२०)
- मार्च ते मे – आयपीएलचा चौदावा हंगाम
- जून – भारताचा श्रीलंका दौरा
(३ वन-डे, ५ टी-२०)
- जून-जुलै – आशिया चषक २०२१
- जुलै – भारताचा झिम्बाब्वे दौरा
(३ वन-डे)
- जुलै ते सप्टेंबर – भारताचा इंग्लंड दौरा
(५ कसोटी)
- ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा
(३ वन-डे, ५ टी-२०)
- ऑक्टोबर – नोव्हेंबर – टी २० विश्व करंडक
- नोव्हेंबर – डिसेंबर – न्यूझीलंडचा भारत दौरा
(२ कसोटी, ३ टी-२० सामने)
- डिसेंबर – भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा
(३ कसोटी, ३ टी-२०)
हेही वाचा - Ind Vs Aus : उसळत्या चेंडूंचा सामना करण्यासाठी भारतीय संघाचा खास सराव; पाहा व्हिडिओ
हेही वाचा - IND vs AUS: क्रिकेट मालिकेआधीच ऑस्ट्रेलियाला जबर झटका; वेगवान गोलंदाजाने घेतली माघार