ETV Bharat / sports

जेव्हा एक कर्णधार माजी कर्णधाराला भेटतो... - भारतीय क्रिकेटपटूंनी दादाची घेतली भेट

बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यानंतर सौरव गांगुलीने प्रथमच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची भेट घेतली. गांगुली आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनी त्यांच्याशी भारतीय क्रिकेट टीमच्या भविष्यातील योजनांबद्दल चर्चा केली.

जेव्हा एक कर्णधार माजी कर्णधाराला भेटतो...
author img

By

Published : Oct 25, 2019, 12:38 PM IST

मुंबई - भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, देशभरात आनंद साजरा करण्यात आला. भारतीय क्रिकेटला नवीन दिशा देणारा कर्णधार आता संघाला बाहेरून मार्गदर्शन करणार या विचाराने सर्वजण सुखावले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने दादाच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला होता. आफ्रिकेविरूद्धचा दौरा संपल्यानंतर, भारतीय क्रिकेट संघाने बीसीसीआयचा नवनियुक्त अध्यक्ष सौरव गांगुलीची भेट घेतली.

  • All smiles at the Senior Selection Committee meeting earlier this afternoon as the teams for the forthcoming T20I & Test series against Bangladesh were announced #TeamIndia 🇮🇳🇮🇳📸📸 pic.twitter.com/BxA1S6Hc0Z

    — BCCI (@BCCI) October 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - हिटमॅनची 'दस नंबरी' कामगिरी, आफ्रिकेची पिसं काढल्यानंतर आयसीसी क्रमवारीत मोठी उडी

बीसीसीआयचा अध्यक्ष झाल्यानंतर सौरव गांगुलीने प्रथमच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची भेट घेतली. गांगुली आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनी त्यांच्याशी भारतीय क्रिकेट टीमच्या भविष्यातील योजनांबद्दल चर्चा केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत महेंद्रसिंग धोनीच्या भविष्याबाबतही चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे, परंतु सर्वांनी या बैठकीबाबत मौन बाळगले.

टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री या बैठकीत सहभागी नव्हते. पुढील महिन्यात ईडन गार्डन्स येथे होणाऱ्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान गांगुली शास्त्रींशी चर्चा करणार आहे. या टी-२० आणि कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट संघाची गुरुवारी घोषणा करण्यात आली.

टी-२० मालिकेसाठी निवड समितीने कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली असून त्याच्या जागी रोहित शर्माला संघाची कमान देण्यात आली आहे. या मालिकेसाठी निवडलेल्या संघात प्रथमच संजू सॅमसन आणि शिवम दुबे या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.

Intro:Body:

हेही वाचा -

टी -२० मालिकेसाठी निवड समितीने कर्णधार विराट कोहलीला विश्रांती दिली असून त्याच्या जागी रोहित शर्माला संघाची कमान देण्यात आली आहे. या मालिकेसाठी निवडलेल्या संघात प्रथमच संजू सॅमसन आणि शिवम दुबे या खेळा़डूंचा संघात समावेश करण्यात आला आहे.

Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.