दुबई - भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला आहे. उभय संघात तीन टी-२०, तीन एकदिवसीय आणि चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्याला २७ नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे.
बीसीसीआयने पीपीई किट घालून ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निघालेल्या खेळाडूंचे फोटो शेअर केले होते. आज खेळाडू सिडनीला पोहोचले आहेत. पुढील १४ दिवस खेळाडूंना क्वारंटाइन राहावे लागणार आहे. दरम्यान, हा क्वारंटाइनचा कालावधी कमी करण्याची मागणी बीसीसीआयने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे केली होती. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ती मागणी मान्य केली नाही.
-
Dubai ✈️ Sydney
— BCCI (@BCCI) November 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Hello Australia! #TeamIndia is here! 💪 pic.twitter.com/Rfu0wZlXW0
">Dubai ✈️ Sydney
— BCCI (@BCCI) November 12, 2020
Hello Australia! #TeamIndia is here! 💪 pic.twitter.com/Rfu0wZlXW0Dubai ✈️ Sydney
— BCCI (@BCCI) November 12, 2020
Hello Australia! #TeamIndia is here! 💪 pic.twitter.com/Rfu0wZlXW0
भारताचा सुधारीत संघ -
- टी-20 - विराट कोहली, शिखर धवन, मयांक अग्रवाल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांडे, संजू सॅमसन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, दीपक चहर, टी नटराजन
- एकदिवसीय संघ - विराट कोहली, शिखर धवन, शुबमन गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, संजू सॅमसन
- कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, शुबमन गिल, वृद्धीमान साहा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव, नवदीप सैनी, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद सिराज
असा आहे भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा –
- पहिला एकदिवसीय सामना – २७ नोव्हेंबर – सिडनी
- दुसरा एकदिवसीय सामना – २९ नोव्हेंबर – सिडनी
- तिसरा एकदिवसीय सामना – १ डिसेंबर – ओव्हल
- पहिला टी-२० सामना – ४ डिसेंबर – ओव्हल
- दुसरा टी-२० सामना – ६ डिसेंबर – सिडनी
- तिसरा टी-२० सामना – ८ डिसेंबर – सिडनी
- पहिला कसोटी सामना – १७ ते २१ डिसेंबर – अॅडलेड (दिवस-रात्र)
- दुसरा कसोटी सामना – २६ ते ३० डिसेंबर – मेलबर्न
- तिसरा कसोटी सामना – ७ ते ११ जानेवारी २०२१ – सिडनी
- चौथा कसोटी सामना – १५ ते १९ जानेवारी – गाबा
हेही वाचा - खुशखबर..! २०२१ चा टी-२० विश्वकरंडक भारतातच, ICC कडून शिक्कामोर्तब
हेही वाचा - Ind Vs Aus : शास्त्री गुरुजींसह टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना; BCCI ने पोस्ट केले खास फोटो