ETV Bharat / sports

रैनाने सोडले मौन, 'या' कारणासाठी आयपीएलमधून घेतली माघार - सुरेश रैना लेटेस्ट न्यूज

भारत परतल्यानंतर सीएसकेच्या टीम मॅनेजमेंटमधील मतभेदांमुळे रैनाने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. आता तीन महिन्यानंतर रैनाने आयपीएल न खेळण्याचे कारण सांगितले आहे. तो म्हणाला, "मला का वाईट वाटेल? मी माझ्या मुलांबरोबर वेळ घालवला आणि माझ्या कुटुंबासाठी उपस्थित होतो. मी माझ्या कुटुंबात परत यावे अशी माझी इच्छा होती.''

suresh raina reveals reasons behind pulling out of ipl 2020
रैनाने सोडले मौन, 'या' कारणासाठी आयपीएलमधून घेतली माघार
author img

By

Published : Jan 3, 2021, 8:57 AM IST

हैदराबाद - भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार फलंदाज सुरेश रैनाने आयपीएल २०२० मध्ये भाग न घेण्याचे कारण उघड केले आहे. आयपीएलसाठी रैना चेन्नई सुपर किंग्ज संघासह यूएईला रवाना झाला. मात्र, स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी आणि वैयक्तिक कारण देत त्याने संपूर्ण सत्रातून आपले नाव मागे घेतले होते.

हेही वाचा - विराटच्या संघाकडून खेळण्यास स्टेनचा नकार

भारत परतल्यानंतर सीएसकेच्या टीम मॅनेजमेंटमधील मतभेदांमुळे रैनाने आयपीएल न खेळण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. आता तीन महिन्यानंतर रैनाने आयपीएल न खेळण्याचे कारण सांगितले आहे. तो म्हणाला, "मला का वाईट वाटेल? मी माझ्या मुलांबरोबर वेळ घालवला आणि माझ्या कुटुंबासाठी उपस्थित होतो. मी माझ्या कुटुंबात परत यावे अशी माझी इच्छा होती. पंजाबमध्ये एक घटना घडली आणि त्यांना माझी गरज होती. कोरोनाच्या वेळेसमवेत मला माझ्या बायकोसोबत राहायचे होते. मी गेली २० वर्षे खेळत आहे आणि मला माहित आहे की मी हे पुन्हा करू शकतो. परंतु, जेव्हा कुटुंबावा आपली गरज असते तेव्हा आपण तिथे असायला हवे. मला वाटले की त्यावेळी ते करणे मला अधिक योग्य वाटले.''

आयपीएलमधील चेन्नईच्या यशस्वी खेळाडूंपैकी सुरेश रैना एक आहे. २०२१ च्या मोसमात चेन्नईकडून तो खेळताना दिसू शकतो. इतकेच नव्हे तर १० जानेवारीपासून होणार्‍या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठीही त्याला उत्तर प्रदेश संघात स्थान देण्यात आले आहे.

मागील वर्षी १५ ऑगस्टला रैनाने महेंद्रसिंह धोनीसोबत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.