मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणाऱ्या, शाहिद आफ्रिदीला गौतम गंभीर, हरभजन सिंग, युवराज सिंह, शिखर धवन या खेळाडूंच्या पाठोपाठ सुरेश रैनाने खडसावले आहे. रैनाने, दुसऱ्याच्या मदतीवर जगणाऱ्या अपयशी देशासाठी काहीतरी करावे आणि काश्मीरचा मुद्दा सोडून द्यावा, असे सांगत आफ्रिदीला त्यांची जागा दाखवून दिली आहे.
रैनाने ट्विट करून शाहिद आफ्रिदीच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. रैना त्याच्या ट्विटमध्ये म्हणतो, 'इतरांचे लक्ष वेधून घेण्यासाठी कोण काय करेल, हे सांगता येत नाही. जो देश आधीच दुसऱ्यांनी दिलेल्या भिक्षेवर जगत आहे. त्या अपयशी देशासाठी तू काही तरी करावे. काश्मीरचा विचार करू नये. काश्मिरी असल्याचा मला गर्व आहे आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भागच राहील.'
-
Gosh! What all a person must do to remain relevant! Even more so for a nation that is living on alms. So, better do something for your failed nation and leave #Kashmir alone. I am a proud Kashmiri and it is and will always remain an inalienable part of India. Jai Hind!🇮🇳❤️💪
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) May 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Gosh! What all a person must do to remain relevant! Even more so for a nation that is living on alms. So, better do something for your failed nation and leave #Kashmir alone. I am a proud Kashmiri and it is and will always remain an inalienable part of India. Jai Hind!🇮🇳❤️💪
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) May 17, 2020Gosh! What all a person must do to remain relevant! Even more so for a nation that is living on alms. So, better do something for your failed nation and leave #Kashmir alone. I am a proud Kashmiri and it is and will always remain an inalienable part of India. Jai Hind!🇮🇳❤️💪
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) May 17, 2020
दरम्यान, याआधी गौतम गंभीरने त्याच्या ट्विटमध्ये पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर बाजवा यांच्यावर निशाणा साधला आहे. गंभीरने आफ्रिदी, इम्रान खान, बाजवा यांचा उल्लेख 'जोकर' असा केला आहे. हे तिघे मोदी यांच्याबद्दल विष पसरवण्याचा काम करत आहेत. यातून ते पाकच्या लोकांना मूर्ख बनवत आहेत, पण निर्णय येईपर्यंतही काश्मीर तुम्हाला मिळणार नाही. बांगलादेश लक्षात आहे ना? असेही त्याने म्हटले आहे. गंभीर शिवाय हरभजनने आफ्रिदीला 'मर्यादेत बोल,' असा सल्ला दिला आहे.
आफ्रिदीने काय म्हटलं ?
आफ्रिदीने काश्मीर प्रश्नावरुन नरेंद्र मोदी ही 'घाबरट व्यक्ती' असल्याचे वक्तव्य केले होते. मोदींनी काश्मीरमध्ये भारताचे सात लाख सैनिक तैनात केले आहेत. इतके सैनिक आमच्या संपूर्ण पाकिस्तानच्या सैन्यात आहेत. परंतु त्यांना हे माहित नाही की, त्या ७ लाख सैनिकांच्या मागे पाकची २२-२३ कोटी जनता उभी आहे. आम्ही आमच्या पाकिस्तानी सैन्यासोबत आहोत, असेही आफ्रिदीने म्हटले होते. पाकव्याप्त काश्मीर खोऱ्यात गरजूंना मदत करण्यासाठी आफ्रिदी गेला होता तिथे त्याने भारतीयांबद्दल वादग्रस्त विधान केलं.
हेही वाचा -...तरीही मागील ७० वर्षांपासून काश्मीरची भीक मागत आहात, गंभीरने आफ्रिदीला सुनावले
हेही वाचा - मर्यादेत राहा, मोदींवर टीका करणाऱ्या आफ्रिदीला हरभजनने सुनावलं