दुबई - चेन्नई सुपर किंग्जचा दिग्गज फलंदाज सुरेश रैनाने आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळल्याबद्दल कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे अभिनंदन केले आहे. आयपीएलच्या १४व्या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद आमने सामने आले होते. या सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच धोनी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळलेला खेळाडू ठरला. या सामन्यात चेन्नईला हैदराबादकडून ७ धावांनी मात खावी लागली.
-
Congratulations Mahi bhai (@msdhoni) at becoming the most capped IPL player. Happiest that my record is being broken by you. All the best for the game today and am sure @ChennaiIPL will win this season’s @IPL. pic.twitter.com/f5BRQTJ0aF
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) October 2, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Congratulations Mahi bhai (@msdhoni) at becoming the most capped IPL player. Happiest that my record is being broken by you. All the best for the game today and am sure @ChennaiIPL will win this season’s @IPL. pic.twitter.com/f5BRQTJ0aF
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) October 2, 2020Congratulations Mahi bhai (@msdhoni) at becoming the most capped IPL player. Happiest that my record is being broken by you. All the best for the game today and am sure @ChennaiIPL will win this season’s @IPL. pic.twitter.com/f5BRQTJ0aF
— Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) October 2, 2020
रैनाने ट्विटरवर लिहिले, "माही भाई आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळल्याबद्दल अभिनंदन. आनंद झाला, की तू माझा विक्रम मोडलास." सनरायझर्सविरुद्धचा सामना हा धोनीच्या आयपीएल कारकिर्दीचा १९४वा सामना होता. चेन्नईचा स्टार फलंदाज आणि यावर्षी आयपीएलमधून माघार घेतलेल्या सुरेश रैनाने १९३ सामने खेळले आहेत. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने २०१०, २०११ आणि २०१८ या वर्षी आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. २००८पासून सुरू झालेल्या या लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जने आठ वेळा अंतिम फेरी गाठली आहे. २०१६ आणि २०१७मध्ये धोनी रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा भाग होता. स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे दोन वर्षासाठी चेन्नईच्या संघावर बंदी आली होती.
सनरायजर्स हैदराबादने चेन्नईला १६५ धावांचे आव्हान दिले होते. हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या २० षटकांत ५ गडी बाद १५७ धावा झाल्या. हैदराबादचा युवा खेळाडू प्रियम गर्ग सामन्याचा मानकरी ठरला. गर्गने २६ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५१ धावा केल्या.