ETV Bharat / sports

सनरायझर्स हैदराबादने केली प्रायोजकांची घोषणा

author img

By

Published : Aug 26, 2020, 11:46 AM IST

आयपीएलमध्ये जिओ, टीसीएल, ड्रीम ११, जय राज स्टील, नेरोलॅक आणि कॉलगेट हे अन्य भागीदार असणार आहेत. सनरायझर्स हैदराबादने टायका, फॅनकोड, आयबी क्रिकेट आणि डबल हॉर्स यांनाही आपले भागीदार बनवले आहे.

Sunrisers hyderabad announces new sponsors for ipl 2020
सनरायझर्स हैदराबादने केली प्रायोजकांची घोषणा

हैदराबाद - आयपीएल फ्रेंचायझी सनरायझर्स हैदराबादने १९ सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या आयपीएलसाठी प्रायोजक जाहीर केले आहेत. २०१६ चा विजेता असलेल्या हैदराबाद संघाची जेके लक्ष्मी सिमेंट लिमिटेड ही कंपनी आपली शीर्षक प्रायोजक असेल. जेके लक्ष्मी सिमेंट लिमिटेडने यावर्षी जानेवारीत हैदराबादशी करार केला होता.

या कराराअंतर्गत जेके लक्ष्मी सिमेंटचा लोगो सनरायझर्स हैदराबादच्या जर्सीवर असेल. या व्यतिरिक्त, रॅल्को टायर्स, व्होल्वोलिन हे देखील संघाचे मुख्य मुख्य प्रायोजक आहेत. संघाच्या जर्सीच्या मागे रल्कोचा लोगो असेल तर व्होव्होलिनचा लोगो उजव्या बाजूला असेल.

त्याशिवाय आयपीएलमध्ये जिओ, टीसीएल, ड्रीम ११, जय राज स्टील, नेरोलॅक आणि कॉलगेट हे अन्य भागीदार असणार आहेत. सनरायझर्स हैदराबादने टायका, फॅनकोड, आयबी क्रिकेट आणि डबल हॉर्स यांनाही आपले भागीदार बनवले आहे.

यूएईत होणाऱ्या आयपीएलला नवा प्रायोजक मिळाला आहे. ड्रीम ११ आता आयपीएलची मुख्य प्रायोजक कंपनी असणार आहे. प्रायोजकत्वासाठी ड्रीम ११ ने २२२ कोटी रूपये मोजले असल्याचे वृत्त आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिले होते. मुख्य प्रायोजकाच्या शर्यतीत अनअ‌ॅकॅडमी, टाटा आणि बायजूस हे देखील होते. अनअ‌ॅकॅडमीने २१० कोटी, टाटाने १८० कोटी आणि बायजूसने १२५ कोटींची बोली लावली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.