मुंबई - लॉकडाऊनमुळे भारतीय संघाचा 'हिटमॅन' सलामीवीर रोहित शर्मासह सर्व खेळाडू आपापल्या घरीच आहेत. खेळाडू लॉकडाऊनचे काटेकोर पालन करत आहेत. या काळात रोहितने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला आहे. यातून त्याने घरीच थांबा, सुरक्षित राहा असे आवाहन केले आहे.
भारतासह जगभरात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. लाखो लोकांना कोरोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या विषाणूशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. डॉक्टर आणि रूग्णालयातील इतर सहकाऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे काही प्रमाणात लोक कोरोनातून बरे होत आहेत. पण दिवसागणिक कोरोनाग्रस्तांच्या संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदींपासून ते प्रत्येक राज्यातील मुख्यमंत्री तसेच इतर क्षेत्रातील मान्यवरांकडून नागरिकांना घरात सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
रोहितने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन, बूटाची लेस बांधतानाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत त्याने घरी राहा, तंदुरूस्त राहा, घराबाहेर पडू नका, निरोगी आणि सुरक्षित राहा, असे आवाहन केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होताना दिसत आहे. जगात सुमारे १६ लाखाहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृताच्या आकडा १ लाखाहून अधिक झाला आहे. भारतामध्ये मागील चोवीस तासात कोरोनाने ४० जणांचा जीव घेतला असून तब्बल १ हजार ०३५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ७ हजार ४४७ वर पोहोचला आहे.
हेही वाचा - सचिन इतका परफेक्ट होता की त्याला बाद करणे अवघड असायचे, क्लार्कची कबुली
हेही वाचा - २०२१ मध्येही ऑलिम्पिक धोक्यात, खुद्द टोकियो ऑलिम्पिक अधिकारींनी दिले संकेत