ETV Bharat / sports

हार्दिक पांड्याने आपल्या मुलाचे केले नामकरण

मर्सिडीज-एएमजी कार कंपनीने या कारच्या मॉडेलचे एक खेळणे हार्दिकच्या मुलासाठी पाठवले आहे. हार्दिकने या गिफ्टसाठी कंपनीला धन्यवाद देत आपल्या मुलाचे नाव सर्वांसमोर आणले. हार्दिकने या भेटवस्तूसह स्वत: चा एक फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला. ''अगस्त्याच्या पहिल्या एएमजीबद्दल धन्यवाद एमएमजी बंगळुरू'', असे हार्दिकने या फोटोवर लिहिले आहे.

star cricketer hardik pandya disclose his newborn sons name

author img

By

Published : Aug 18, 2020, 12:43 PM IST

नवी दिल्ली - भारताचा युवा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आपल्या मुलाचे नामकरण केले आहे. हार्दिक आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा स्टँकोविच नुकतेच पालक झाले आहेत. नताशाने एका गोंडस मुलाला जन्म दिला असून हार्दिकने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या मुलाचे नाव सर्वांसमोर आणले आहे.

मर्सिडीज-एएमजी कार कंपनीने या कारच्या मॉडेलचे एक खेळणे हार्दिकच्या मुलासाठी पाठवले आहे. हार्दिकने या गिफ्टसाठी कंपनीला धन्यवाद देत आपल्या मुलाचे नाव सर्वांसमोर आणले. हार्दिकने या भेटवस्तूसह स्वत: चा एक फोटो आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट केला. ''अगस्त्याच्या पहिल्या एएमजीबद्दल धन्यवाद एमएमजी बंगळुरू'', असे हार्दिकने या फोटोवर लिहिले आहे.

star cricketer hardik pandya disclose his newborn sons name
हार्दिक पांड्याने आपल्या मुलाचे केले नामकरण

हार्दिकने लॉकडाऊन काळात सोशल मीडियावर चाहत्यांसमवेत नताशाच्या गरोदरपणाची माहिती देत काही फोटो देखील शेअर केले होते. त्या फोटोंपैकी एका फोटोमध्ये हार्दिकने घरातच एक धार्मिक विधी केल्याचा फोटो पोस्ट केला होता. तेव्हा इतरांप्रमाणे हार्दिकने देखील लॉकडाऊन लग्न उरकले की काय? अशी चर्चा चाहत्यांमध्ये रंगली होती.

हार्दिक आणि अभिनेत्री नताशाने जानेवारीत महिन्यात साखरपूडा केला होता. त्यानंतर ते दोघे सोबतच राहत होते. काही दिवसांपूर्वीच दोघांचे मॅटर्निटी शूटचे फोटो हार्दिकने शेअर केले होते. हार्दिक बाप झाल्याची बातमी समजताच त्याचे क्रिकेटपटू मित्र आणि चाहत्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.