ETV Bharat / sports

CRICKET WORLD CUP : श्रीलंकेसमोर पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान

दिग्गज कांगारू फलंदाज स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनामुळे कांगारुंची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे.

श्रीलंकेसमोर पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान
author img

By

Published : Jun 15, 2019, 1:04 PM IST

Updated : Jun 15, 2019, 1:25 PM IST

लंडन - आयसीसी विश्वकरंडकात आज २०व्या सामन्यात श्रीलंकेसमोर बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान असणार आहे. श्रीलंकन संघाला या स्पर्धेत चारपैकी दोनच सामने प्रत्यक्ष मैदानात खेळता आले असून यातील एका सामन्यात त्यांचा पराभव आणि एका सामन्यात विजय झला आहे. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्याविरूद्धचे त्यांचे सामने पावसामुळे रद्द झाल्याने ४ गुणांसह श्रीलंकेचा संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने विश्वकरंडकात आतापर्यंत चांगली कामगिरी केली असून ४ पैकी ३ सामन्यात विजय मिळवून ते ६ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

अ‍ॅरोन फिंचच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियन संघात वॉर्नरसह, स्टीव्हन स्मिथ, शॉन मार्श, उस्मान ख्वाजा असे दमदार फलंदाज आहेत. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जेसन बेहरेनडॉर्फ, नाथन कॉल्टर नाईल व केन रिचर्डसन, ऍडम झम्पा, नाथन लॉयन असा गोलंदाजांचा ताफा असल्याने स्पर्धेतील एक संतुलित संघ म्हणून ऑस्ट्रेलियाकडे पाहिले जात आहे.

डेव्हिड वार्नर
डेव्हिड वार्नर

दिग्गज कांगारू फलंदाज स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या पुनरागमनामुळे कांगारुंची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. वॉर्नरने आतापर्यंत खेळल्या गेलेल्या ४ सामन्यांमध्ये दोन अर्धशतके आणि एक शतकाच्या जोरावर २५५ तर तर स्मिथने १७० धावा केल्या आहेत.

लसिथ मलिंगा
लसिथ मलिंगा

श्रीलंकेला ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाला हा सामना जिंकायचा असल्यास कर्णधार दिमुथ करुणारत्नेसह, कुशल परेरा, अँजेलो मॅथ्यूज आणि थिसारा परेरा यांना आपली सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे. तर कांगारू फलंदाजांना कमी धावसंख्येत रोखण्याचे कठीण आव्हान श्रीलंकन गोलंदाज लसिथ मलिंगा आणि सुरंगा लकमल यांच्यापुढे असेल.

हा सामना लंडन शहरातील द ओव्हल स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे.

असे आहेत दोन्ही संघ

  • ऑस्ट्रेलिया - अ‍ॅरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरनडॉर्फ, अ‍ॅलेक्स कॅरी, नथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, उस्मान ख्वाजा, नथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, झाय रिचर्डसन, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेव्हिड वार्नर आणि अ‍ॅडम झॅम्पा.
  • श्रीलंका - दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लसिथ मलिंगा, अँजेलो मॅथ्यूज, थिसारा परेरा, कुशल परेरा, धनंजय डिसेल्वा, कुशल मेंडिस, आयसुरु उडाना, मिलींदा सिरिवर्धना, अविष्का फर्नांडो, जीवन मेंडिस, लाहिरु थिरिमन्ने, जेफ्री वंडरसे, नुवान प्रदीप, सुरांगा लकमल.

Intro:Body:

kl;

Conclusion:
Last Updated : Jun 15, 2019, 1:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.