मुंबई - स्पॉट फिक्सिंगप्रकरणी बीसीसीआयने माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीसंतवर आजीवन बंदी घातली आहे. यावर सर्वोच्च न्यायालयात बोलताना, माझ्या विरोधात कुठलाही सबळ पुरावा नाही. त्यामुळे बीसीसीआयने माझ्यावर आजीवन बंदी घालणे अयोग्य आहे, असे श्रीसंतने म्हटले आहे.
No evidence against me, Delhi police’s tortures led to confession: S Sreesanth to Supreme Court – Times Now https://t.co/ywiam0OF1r pic.twitter.com/huudBMxvCH
— Delhi Informer (@delhiinformer) February 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">No evidence against me, Delhi police’s tortures led to confession: S Sreesanth to Supreme Court – Times Now https://t.co/ywiam0OF1r pic.twitter.com/huudBMxvCH
— Delhi Informer (@delhiinformer) February 27, 2019No evidence against me, Delhi police’s tortures led to confession: S Sreesanth to Supreme Court – Times Now https://t.co/ywiam0OF1r pic.twitter.com/huudBMxvCH
— Delhi Informer (@delhiinformer) February 27, 2019
यावेळी श्रीसंतने बंदीला विरोध करत कॉल रेकॉर्डिंगचा हवाला दिला. तो म्हणाला, मला स्पॉट फिक्सिंगच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मी त्यात अडकलो नाही. याशिवाय, मी २०१३ च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असताना, त्यांनी मला फिक्सिंगचे आरोप मान्य करण्यासाठी प्रचंड त्रास दिला, असेही श्रीसंतने म्हटले आहे.
माझ्यावर सर्वात गंभीर आरोप लावण्यात आले होते. परंतु, पुराव्यांचा विचार केल्यास माझ्यावरील आरोप आजीवन बंदी घालण्या इतपत गंभीर नाहीत. बीसीसीआयच्या आजीवन बंदीच्या विरोधात श्रीसंतने केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र केरळ उच्च न्यायालयाने बीसीसीआयचा निर्णय कायम ठेवला.