ETV Bharat / sports

पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांना क्रीडा जगताने वाहिली आदरांजली - sp balasubrahmanyam death news

माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण, गौतम गंभीर, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार, फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि महान धावपटू पी. टी. उषा यांनी एस. पी. बालसुब्रमण्यम यांना आदरांजली वाहिली आहे.

sports world mourns the death of sp balasubrahmanyam
पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनावर क्रीडा जगताने व्यक्त केला शोक
author img

By

Published : Sep 25, 2020, 8:07 PM IST

नवी दिल्ली - सुप्रसिद्ध पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी आज (शुक्रवार) चेन्नई येथील खासगी रुग्णालयात दुपारी १ वाजून ४ मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला. एस. पी. बालसुब्रमण्यम यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांना ५ ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर त्यांनी स्वतःच व्हिडिओ तयार करून यातून आपण ठीक असल्याची माहिती चाहत्यांना दिली होती. मात्र ते कोरोनावर मात करु शकले नाही. क्रीडा जगाताने एस.पी. बालसुब्रमण्यम यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण, गौतम गंभीर, कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार, फिरकीपटू रविचंद्रन अश्विन, भारताचा माजी कर्णधार आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि महान धावपटू पी. टी. उषा यांनी एस. पी. बालसुब्रमण्यम यांना आदरांजली वाहिली आहे.

  • Sad to learn about the demise of singing maestro S. P. Balasubrahmanyam. He leaves behind a huge void. Strength to his family and fans.
    Om Shanti 🙏

    — P.T. USHA (@PTUshaOfficial) September 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • For me personally, I remember coming to your house the one time and you politely obliged me by singing a few lines of my favourite songs. Will never ever forget that day.

    SPB sir ,am not gonna lie , I wanted to do that just once more,well,alas , it will remain a lifelong

    Contd

    — DK (@DineshKarthik) September 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Shattered to hear about passing of SPB sir. A Legend of Indian Cinema. His songs will reverberate forever. His friendship, love for the game and our chennai meetings will be cherished forever. My heartfelt condolences to Sudakar, Sailaja, Charan and rest of family and fans. 🙏🏽

    — Anil Kumble (@anilkumble1074) September 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बालसुब्रमण्यम यांचा संक्षिप्त परिचय -

एसपीबी यांचा जन्म ४ जून १९४६ला आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्ह्यातील कोनेटम्मापेटा येथे झाला होता. त्यांचे पूर्ण नाव श्रीपती पंडितराध्युला बालसुब्रह्मण्यम असे होते. गायक एस. पी. शैलजा यांच्यासह त्यांना दोन भाऊ व पाच बहिणी आहेत. पार्श्वगायक बालसुब्रह्मण्यम यांनी १९६६मध्ये त्यांचे गुरू एस. पी. कोदंडपाणी यांचा तेलुगु चित्रपट श्री श्री श्री मर्यादा रामण्णाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. यानंतर त्यांनी लवकरच कन्नड, तमिळ आणि मल्याळम भाषांमधील चित्रपटामध्येही गायन केले.

एस. पी. बालसुब्रमण्यम हे बर्‍याच जणांचे आकर्षण आहेत आणि त्यांनी बऱ्याच चित्रपटांची शीर्षक गीते गायिली आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यात सर्वाधिक गाणी गाण्याचा विक्रम केला असून यासाठी त्यांचे गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये नाव कोरले गेले आहे. त्यांनी दरवर्षी सरासरी तब्बल ९३० गाणी गायिली किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, दररोज सुमारे ३ गाणी गायली. एस. पी. बालसुब्रमण्यम यांनी आतापर्यंत तब्बल 40 हजारहून अधिक गाणी गायिली आहेत. हा विक्रम जगातील कोणत्याही गायकासाठी सहजासहजी मोडता येणार नाही असा अत्युत्कृष्ट आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.