नवी दिल्ली - आयसीसी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला ३० मेला सुरुवात होणार असून प्रत्येक संघ विजयाचा दावा करत आहे. मात्र, या दहा संघामध्ये दक्षिण आफ्रिका हा असा संघ आहे जो, सर्व बाबतीत वरचढ आहे. मात्र दरवेळेला विश्वचषक स्पर्धेत मोक्याच्या वेळी गचाळ कामगिरी करत स्पर्धेबाहेर फेकला गेला जातो.
आफ्रिका संघाने १९९२ पासून २०१५ पर्यंतच्या सर्व विश्व चषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली. मात्र, निर्णायक सामन्यांमध्ये पराभूत होउन स्पर्धेबाहेर फेकला गेलाय. त्यामुळे यंदा इंग्लडमध्ये होत असलेल्या विश्वचषक स्पर्धेत तरी त्यांच्यावर बसलेला 'चोकर्स'चा शिक्का पुसणार का? हे पहावे लागेल.

का बसला 'चोकर्स'चा शिक्का ?
दक्षिण आफ्रिकने १९९२ च्या विश्वचषक स्पर्धेत चांगली कामगिरी केली. मात्र, त्यांना उपांत्य फेरीत डकवर्थ लुईसच्या नियमानुसार स्पर्धेबाहेर जावे लागले. त्यानंतर १९९९ च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये आफ्रिका संघ 'कमनशिबी' ठरला. या स्पर्धेतील उपांत्य सामन्यात लान्स क्लुजनर आणि अॅलन डोनाल्ड हे दोघे धाव घेण्यात चुकले आणि आफ्रिका संघाला स्पर्धेबाहेर जावे लागले. तर २००३ च्या विश्वचषक स्पर्धेतही या संघाने मोक्याच्या क्षणी गचाळ कामगिरी केली आणि संघाला स्पर्धेबाहेर जावे लागले. या सर्व कारणाने आफ्रिकासंघावर 'चोकर्स'चा शिक्का बसला. मात्र, यंदाची विश्वचषक स्पर्धा जिंकून 'चोकर्स'चा शिक्का पुसने हे फाफ डू प्लेसिसच्या संघासमोरील मोठे आव्हान असेल.

यंदा दक्षिण आफ्रिकासंघाच्या कर्णधारपदाची धुरा फाफ डू प्लेसिस याच्यावर आहे. तर संघात अनुभवी हाशिम आमला, डेविड मिलर, क्विंटन डी कॉक, जेपी ड्यूमिनी, यांच्यावर फलंदाजीची मुख्य कमान असणार आहे. यांना साथ अॅडेन मार्करम, रॅसी वॅन डर ड्यूसेन यांना लाभणार आहे. तर गोलदांजीची कमान डेल स्टेन, कासिगो रबाडा यासह अनुभवी फिरकी गोलंदाज इमरान ताहिर यांच्यावर असणार आहे. त्याला साथ लुंगी एनगिडी, ख्रिस मॉरिस, तब्रिज शम्सी यांची असणार आहे.

विश्वचषक स्पर्धेसाठी हे आहेत दक्षिण आफ्रिकेचे शिलेदार
- फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अॅडेन मार्करम, क्विंटन डि कॉक (यष्टीरक्षक), हाशिम अमला, रॅसी वॅन डर ड्यूसेन, डेविड मिलर, एंडिले फेलुकवायो, जेपी ड्यूमिनी, ड्वेन प्रिस्टोरियस, डेल स्टेन, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, ख्रिस मॉरिस, इमरान ताहिर, तब्रिज शम्सी.