डरबन - दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यावर आफ्रिकेने १७० धावांची आघाडी घेत पकड मजबूत केली आहे. पहिल्या डावात २३५ वर सर्वबाद झाल्यानंतर आफ्रिकेने श्रीलंकेला डेल स्टेनच्या गोलंदाजीच्या बळावर १९१ धावांत सर्वबाद केले.
South Africa close the day on 126/4, 170 runs ahead of Sri Lanka. @faf1307 and @QuinnyDeKock69 are the unbeaten batsmen overnight. #SAvSL LIVE ⬇️
— ICC (@ICC) February 14, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
https://t.co/ILua51ZiiN pic.twitter.com/bcAi6XOMsY
">South Africa close the day on 126/4, 170 runs ahead of Sri Lanka. @faf1307 and @QuinnyDeKock69 are the unbeaten batsmen overnight. #SAvSL LIVE ⬇️
— ICC (@ICC) February 14, 2019
https://t.co/ILua51ZiiN pic.twitter.com/bcAi6XOMsYSouth Africa close the day on 126/4, 170 runs ahead of Sri Lanka. @faf1307 and @QuinnyDeKock69 are the unbeaten batsmen overnight. #SAvSL LIVE ⬇️
— ICC (@ICC) February 14, 2019
https://t.co/ILua51ZiiN pic.twitter.com/bcAi6XOMsY
पहिल्या डावात श्रीलंकेने चांगली गोलंदाजी करताना आफ्रिकेला मोठे आव्हान उभे करण्यापासून रोखले होते. परंतु, श्रीलंकेला आफ्रिकेवर आघाडी घेता आली नाही. संघाकडून कुसल परेरा ५१ धावा व्यतिरिक्त एकाही खेळाडूला अर्धशतकी भागीदारी करता आली नाही. तळआचे फलंदाज धनंजय डिसिल्वा २३ धावा, लसिथ इम्बुलडेनिया २४ धावा आणि कुसल रजिथाने १२ धावा करत श्रीलंकेची धावसंख्या १९१ धावांपर्यंत पोहचवली. डेल स्टेनने श्रीलंकेला कमी धावसंख्येवर रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने अवघ्या ४८ धावा देताना ४ गडी बाद केले. त्याला व्हर्नोन फिलेंडर आणि कगिसो रबाडाने २-२ गडी बाद करत चांगली साथ दिली.
आफ्रिकेन पहिल्या डावात ४४ धावांची आघाडी घेतली. आफ्रिकेने दुसऱ्या डावात चांगली कामगिरी करताना दुसऱ्या दिवसअखेर ४ गड्यांच्या मोबदल्यात १२६ धावा केल्या. आफ्रिकेकडे सध्या १७० धावांची आघाडी असून सामन्यात आणखी ३ दिवस बाकी आहेत. दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यासाठी आफ्रिकेला चांगली संधी असणार आहे.