पोर्ट एलिझाबेथ - यजमान दक्षिण आफ्रिकेला श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत २-० अशा मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाचा फटका आफ्रिकेला आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत बसला आहे. आफ्रिकेचा संघ पराभवानंतर तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
🚨 RANKINGS UPDATE 🚨
— ICC (@ICC) February 23, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
South Africa slip to third in @MRFWorldwide Test Team Rankings after shock whitewash by Sri Lanka.
READ 👇https://t.co/vNHsrJHMqH pic.twitter.com/GTcfXHa3hn
">🚨 RANKINGS UPDATE 🚨
— ICC (@ICC) February 23, 2019
South Africa slip to third in @MRFWorldwide Test Team Rankings after shock whitewash by Sri Lanka.
READ 👇https://t.co/vNHsrJHMqH pic.twitter.com/GTcfXHa3hn🚨 RANKINGS UPDATE 🚨
— ICC (@ICC) February 23, 2019
South Africa slip to third in @MRFWorldwide Test Team Rankings after shock whitewash by Sri Lanka.
READ 👇https://t.co/vNHsrJHMqH pic.twitter.com/GTcfXHa3hn
मालिका सुरू होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात ११० गुण जमा होते आणि संघ दुसऱ्यास्थानी होता. परंतु, घरच्या मैदानावर पराभव झाल्यानंतर आफ्रिकेला ५ गुणांचे नुकसान झाले. त्यामुळे संघ १०५ गुणांसह तिसऱ्या स्थानी घसरला आहे. तर, १०७ गुणांसह न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर आला आहे. भारतीय संघ ११६ गुणांसह क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवल्यानंतर श्रीलंकेच्या खात्यात ४ गुणांची वाढ झाली आहे. परंतु, संघ अद्यापही सहाव्या क्रमांकावर कायम आहे.
पाहुण्या श्रीलंका संघाने दक्षिण आफ्रिकेत चांगली कामगिरी करताना यजमान आफ्रिकेला दुसऱ्या कसोटीत ८ गड्यांनी नमवले. विजयासह श्रीलंकेने आफ्रिकेला व्हाईटवॉश दिला. अशी कामगिरी करणारा पहिला आशियाई संघ ठरला. मालिकेत श्रीलंकेने चांगली कामगिरी करताना दक्षिण आफ्रिकेला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही.