ETV Bharat / sports

पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव; आफ्रिकेने १४व्या षटकात मिळवला विजय - दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानवर विजय

जॉर्ज लिंडे याची अष्टपैलू कामगिरी आणि एडेन मार्करम याची ५४ धावांची खेळी याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला.

south-africa-beat-pakistan-by-6-wickets-in-second-t20i
पाकिस्तानचा लाजिरवाना पराभव; आफ्रिकेने १४व्या षटकात मिळवला विजय
author img

By

Published : Apr 13, 2021, 4:34 PM IST

जोहान्सबर्ग - जॉर्ज लिंडे याची अष्टपैलू कामगिरी आणि एडेन मार्करम याची ५४ धावांची खेळी याच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानचा ६ गडी राखून पराभव केला. या विजयासह आफ्रिकेने चार सामन्याच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली.

पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात ९ बाद १४० धावा केल्या. यात कर्णधार बाबर आझमने ५० धावांची खेळी केली. बाबर वगळता हाफिजने सर्वाधिक ३२ धावा केल्या. जॉर्ज लिंडेने ४ षटकात २३ धावा देत ३ गडी बाद केले. त्याला विल्यमसने ३ गडी बाद करत चांगली साथ दिली. लिंडेने या सामन्यात तीन झेल टिपले.

पाकिस्तानने दिलेले १४१ धावांचे आव्हान आफ्रिकेने १४ व्या षटकातच चार गड्याच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. मार्करमने ३० चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ५४ धावांची खेळी केली. तर हेनिरिच (३६) आणि लिंडे (२०) या दोघांनी नाबाद राहत आफ्रिकेला विजय मिळवून दिला. उभय संघातील तिसरा सामना १४ एप्रिलला होणार आहे.

हेही वाचा - IPL २०२१: कोलकात्यासमोर मुंबईचं तगडं आव्हान; मागील १२ सामन्यात फक्त १ विजय, जाणून घ्या आकडेवारी

हेही वाचा - IPL २०२१ : मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी दिल्या गुढी पाडव्याच्या मराठीतून शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.