कोलकाता - बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली आणि त्याची मुलगी सना सध्या सोशल मीडियावर रंगलेल्या गोड भांडणामुळे चर्चेत आहेत. क्रिकेट आणि क्रिकेटबाहेर गांगुली जेवढा आक्रमक आणि रोखठोक असतो, त्याचप्रमाणे त्याची मुलगी सनासुद्धा रोखठोक असल्याचं या भांडणातून दिसून आलं आहे.
हेही वाचा - माझ्यामुळेच भारताचे विश्वविजेता होण्याचे स्वप्न भंगले - विराट कोहली
नुकत्याच झालेल्या भारत विरूद्ध बांगलादेश यांच्यातील दिवस-रात्र कसोटी दरम्यानचा एक फोटो गांगुलीने सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये गांगुलीची गंभीर भावमुद्रा दिसून येते. त्याच्या या फोटोवर सनाने प्रतिक्रिया देत, ''असं काय आहे जे तुम्हाला आवडललेलं नाही? असा प्रश्न विचारला. तिच्या या प्रश्नावर गांगुलीने 'तुझा हट्टीपणा' असं उत्तर दिलं. गांगुलीची हे उत्तर पाहुन सनानेही त्याच्याच अंदाजात उत्तर देत 'हे सर्व तुमच्याकडून शिकत आहे', अशी प्रतिक्रिया दिली. त्यांचा हा सोशल मीडियावरील संवाद पाहुन नेटकऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
गांगुलीच्या प्रयत्नामुळे हा ऐतिहासिक कसोटी सामना खेळवणे शक्य झाले. कोलकाताच्या इडन गार्डन्सवर रंगलेल्या या सामन्यात भारताने बांगलादेशला एक डाव आणि ४६ धावांनी हरवलं आहे .