कोलकाता - टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला सद्या यष्टीरक्षणासह फलंदाजीत म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. यामुळे त्याच्यावर माजी खेळाडूंनी टीकेची झोड उठवली. पण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी पंतची पाठराखण करत त्याला अजून वेळ द्यायला हवा, असे मत व्यक्त केले आहे.
महेंद्रसिंह धोनीचा वारसदार म्हणून ऋषभ पंतकडे बघितले जात आहे. मात्र, पंत बांगलादेश विरुध्द सुरू असलेल्या टी-२० मालिकेत यष्टीरक्षणासह फलंदाजीतही अपयशी ठरला आहे.
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात २६ चेंडूत २७ धावा करणाऱया पंतने यष्टीरक्षण व डीआरएसचा निर्णय घेताना केलेल्या चुकांचा फटका भारताला बसला. दुसऱया सामन्यात त्याने यष्टीच्या पुढे चेंडू पकडून चूक केली. मात्र त्याने धावबाद व यष्टीचीत करत आपल्यावरील दबाव कमी केला.
यावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी पंतची पाठराखण केली. ते म्हणाले, '‘पंत चांगला खेळाडू आहे. तो नक्कीच चांगली कामगिरी करेल. पण त्याला थोडा वेळ द्यायला हवा.'
दरम्यान, दुसरा टी-२० सामना जिंकत टीम इंडियाने बांगलादेश विरुध्दची मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे. या मालिकेतील अखेरचा सामना नागपूरच्या मैदानात १० नोव्हेंबरला रंगणार आहे.
हेही वाचा - डोपिंग प्रकरणात अडकलेल्या पृथ्वी शॉला वाढदिवसादिवशी 'गुड न्यूज'
हेही वाचा - ये पठाण के हाथ हैं ठाकुर..! यूसुफ पठाणच्या शानदार झेलवर राशिद खानची मजेशीर कमेंट