मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली परत एकदा बंगाल क्रिकेट असोसिएशनचा (सीएबी) अध्यक्ष होणार आहे. एका मीडियासंस्थेच्या वृत्तानुसार सीएबीच्या अध्यक्षपदासाठी दादाची बिनविरोध निवड होऊ शकते.
-
CAB Elections: Sourav Ganguly set to be re-elected unopposed https://t.co/q1JvSV8UEP pic.twitter.com/0WAY24yEbY
— SportsGridUK (@Sportsgriduk) September 21, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">CAB Elections: Sourav Ganguly set to be re-elected unopposed https://t.co/q1JvSV8UEP pic.twitter.com/0WAY24yEbY
— SportsGridUK (@Sportsgriduk) September 21, 2019CAB Elections: Sourav Ganguly set to be re-elected unopposed https://t.co/q1JvSV8UEP pic.twitter.com/0WAY24yEbY
— SportsGridUK (@Sportsgriduk) September 21, 2019
हेही वाचा - सुनील गावस्कर आणि सुनील शेट्टी झाले 'या' अमेरिकन कंपनीचे ब्रँड अँम्बेसेडर
गांगुलीच्या पाच सदस्यीय पॅनेलने एकाही उमेदवाराची मुलाखत घेतलेली नाही. सीएबीच्या अध्यक्षपदाच्या जागेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख काल शनिवारपर्यंत होती. सीएबीची ८५ वी वार्षिक आमसभा या महिन्यात २८ सप्टेंबरला होणार आहे.
याअगोदर सर्वोच्च न्यायालयाने गांगुलीला सीएबीच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक लढवण्याची परवानगी दिली होती. जगमोहन दालमिया यांच्या मृत्यूनंतर २०१५ मध्ये दादाची सीएबीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
पॅनेल -
- अध्यक्ष : सौरभ गांगुली
- उपाध्यक्ष : नरेश ओझा
- सचिव : अविषेक डालमिया
- संयुक्त सचिव : देवव्रत दास
- कोषाध्यक्ष : देबाशीष गांगुली