ETV Bharat / sports

'या' चॅनेलवर पाहता येणार इंग्लंड विरूद्ध विंडीज कसोटी मालिका - sony six latest news

या संपूर्ण मालिकेत नव्या नियमांमुळे क्रिकेटच्या इतिहासात मोठ्या बदलांची नोंद होईल. प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात लाळबंदी करण्यात आली आहे. कसोटी मालिकेची उभारणी म्हणून, स्पोर्ट्स नेटवर्कने नासिर हुसेन, मायकेल अ‍ॅथर्टन आणि इयान बिशप यासारख्या दिग्गज क्रिकेटपटूंना समालोचनासाठी नेमले आहे.

sony six willl broadcast england vs west indies test series
'या' चॅनेलवर पाहता येणार इंग्लंड विरूद्ध विंडीज कसोटी मालिका
author img

By

Published : Jul 6, 2020, 2:17 PM IST

मुंबई - कोरोनाव्हायरसमुळे 120 दिवसांच्या विश्रांतीनंतर वेस्ट इंडिजच्या इंग्लंड दौर्‍यासह क्रिकेटचे पुनरागमन होणार आहे. अशा परिस्थितीत दर्शकांना 8 जुलैपासून दुपारी साडेतीन वाजता ही मालिका सोनी सिक्स चॅनेलवर पाहण्याची संधी मिळेल. पहिला कसोटी सामना एजेस बाउल (साउथम्प्टन) येथे खेळला जाईल. तर दुसरा व तिसरा कसोटी सामना अनुक्रमे 16 जुलै आणि 24 जुलै दरम्यान मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड येथे होईल.

या संपूर्ण मालिकेत नव्या नियमांमुळे क्रिकेटच्या इतिहासात मोठ्या बदलांची नोंद होईल. प्रेक्षकांशिवाय खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात लाळबंदी करण्यात आली आहे. कसोटी मालिकेची उभारणी म्हणून, स्पोर्ट्स नेटवर्कने नासिर हुसेन, मायकेल अ‍ॅथर्टन आणि इयान बिशप यासारख्या दिग्गज क्रिकेटपटूंना समालोचनासाठी नेमले आहे.

इंग्लंड क्रिकेट संघाचा कर्णधार जो रूट यानेही नेटवर्कच्या अधिकृत फेसबुक पेजवर सोनी टेन पिट स्टॉपवर आगामी मालिका, नवीन सूचनांसह क्रिकेट पुन्हा सुरू करण्याविषयी सांगितले आहे.

ही बहुप्रतिक्षित मालिका जाहिरातदारांना फायदेशीर ठरेल. त्यात माय-11 सर्कल, स्कोडा, आयटीसी डियोड्रेंट्स, बायजूस न्यूज, भारती एअरटेल, कार्स 24, इन्फिनिटी रिटेल (क्रोमा) आणि पॉलिसी बाजार यांना असोसिएट प्रायोजक आहेत.

सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडियाचे मुख्य महसूल अधिकारी (वितरण आणि प्रमुख क्रीडा व्यवसाय) राजेश कौल म्हणाले, ''जगात 120 दिवसांहून अधिक लाईव्ह क्रिकेट झाले नाही. मात्र, इंग्लंड-विंडीज मालिकेतून आमचे दर्शक याचा आनंद घेऊ शकतात. भारतीयांना क्रिकेटची कधीही न संपणारी भूक आहे आणि देशभरातील चाहते क्रिकेटमध्ये रस घेतात. जो रूट, बेन स्टोक्स, जेसन होल्डर यांना पाहण्याची संधी मिळेल. या मालिकेसाठी आमच्याकडे उत्तम जाहिरातदार आहेत.''

ABOUT THE AUTHOR

author-img

...view details

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.