सेंच्युरियन - इंग्लंडबरोबर सुरू असलेल्या कसोटी मालिकेनंतर निवृत्तीची घोषणा करणारा दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज व्हर्नान फिलँडर आता नवीन संघासोबत दिसणार आहे. इंग्लिश काऊन्टी क्लब सोमरसेटमध्ये फिलँडर सामील होईल. 'सॉमरसेट काउंटी क्लब अधिकृतपणे याची पुष्टी करतो की आम्ही फिलँडरशी वैयक्तिकरित्या करार केला आहे आणि २०२० नंतर तो आमचा खेळाडू असेल', असे सॉमरसेटने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
-
Philander has earlier played for Somerset in 2012 when in five matches he took 23 wicketshttps://t.co/1fwH55vKwD
— India.com (@indiacom) December 29, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Philander has earlier played for Somerset in 2012 when in five matches he took 23 wicketshttps://t.co/1fwH55vKwD
— India.com (@indiacom) December 29, 2019Philander has earlier played for Somerset in 2012 when in five matches he took 23 wicketshttps://t.co/1fwH55vKwD
— India.com (@indiacom) December 29, 2019
हेही वाचा - टीम इंडियाची आफ्रिकेवर मात, १८ वर्षाचा यशस्वी जयस्वाल चमकला
फिलँडरने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याची घोषणा केली. इंग्लंडसोबतची कसोटी मालिका संपताच फिलँडर सोमरसेटमध्ये सामील होईल. ३४ वर्षीय फिलँडर क्लबचे सर्व सामने खेळणार आहे. यापूर्वी तो २०१२ मध्ये क्लबकडून खेळला होता. पाच सामन्यांच्या करारादरम्यान फिलँडरने २३ बळी घेतले होते.
फिलँडरने या कराराबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हा माझ्यासाठी सन्मानाचा असून हा एक महान क्लब आहे आणि काही वर्षांपूर्वी मी या क्लबकडून खेळण्याचा आनंद घेतला. मला या क्लबसाठी माझे पूर्ण योगदान द्यायचे असल्याचे फिलँडरने म्हटले आहे.
फिलँडरने २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तर कसोटीत २०११ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघात 'एन्ट्री' केली होती. त्याने पदार्पणाच्या सामन्यात १५ धावात ५ गडी बाद करत लक्ष वेधले होते. त्यानं कसोटी क्रिकेटमध्ये अवघ्या ७ सामन्यांत ५० विकेट पूर्ण केल्या असून १९०० सालापासून अशी कामगिरी करणारा तो एकमेव गोलंदाज आहे.