अॅडलेड - ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज स्टिव्ह स्मिथ पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. यातून सावरून २६ डिसेंबर रोजी होणारा उभय संघातील बॉक्सिंग डे कसोटी सामना आपण खेळणार असल्याचा निर्धार स्टिव्ह स्मिथने बोलून दाखवला. स्मिथला पाठीचा त्रास होत आहे. त्याच्या मते, पहिली कसोटी देखील खेळू शकणार की नाही. यावर त्याला सशांकता होती.
स्मिथने मंगळवारी सांगितले की, मी जेव्हा उभा राहतो. किंवा काही हालचाल करतो. त्यावेळी कोणताही त्रास मला जाणवत नाही. पण मी जेव्हा खाली बसतो. तेव्हा माझ्या पाठीत त्रास होत आहे. पण मला वाटतं की, मी दुसरा कसोटी सामन्याआधी फिट होईन.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २६ डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटी सामना होणार आहे. हा सामना मेलबर्नच्या मैदानावर होणार आहे. स्मिथची या मैदानावर कामगिरी उल्लेखनीय असून त्याने या मैदानावर ६३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. यामुळेच तो मेलबर्नची कसोटी खेळण्यासाठी इच्छुक आहे.
उभय संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. यातील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून जिंकत मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. आता उभय संघातील दुसऱ्या सामन्यावर तमाम क्रिकेट प्रेंमीच्या नजरा आहेत.
हेही वाचा - Boxing Day कसोटीआधी अजिंक्य रहाणेसाठी वसीम जाफरने लिहला 'सीक्रेट' मॅसेज
हेही वाचा - NZ Vs PAK : पाकने व्हाईटवॉशची नामुष्की टाळली; अखेरच्या सामन्यात ४ गडी राखून विजय