मुंबई - मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) विजय हजारे ट्रॉफीच्या शिबिरासाठी १०४ खेळाडूंची घोषणा केली आहे. यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शिवम दुबे, धवल कुलकर्णी तसेच स्थानिक क्रिकेट खेळलेले अर्जुन तेंडुलकर, अरमान जाफर यांचा समावेश आहे.
यंदा रणजी स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार नसल्याचे बीसीसीआयने जाहीर केले. मात्र, विजय हजारे ट्रॉफी, १९वर्षांखालील राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धा आणि महिलांची राष्ट्रीय ५० षटकांची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.
हेही वाचा - चेतेश्वर पुजाराला खेळायचंय आयपीएल, म्हणतो...
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी मुंबईकर श्रेयस अय्यर भारतीय संघाचा सदस्य होता. अॅडलेड कसोटीत पृथ्वी शॉला सलामीवीराची संधी मिळाली. दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनने यंदाच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये हरियाणाविरूद्ध पदार्पण केले. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. या सर्व निवडलेल्या खेळाडूंना एमसीए शरद पवार क्रिकेट अकादमी येथे उद्या म्हणजेच १ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ८ वाजता हजर व्हायचे आहे.
खेळाडू -
श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शिवम दुबे, सूर्य कुमार यादव, आदित्य तारे, सियाध लाड, धवल कुलकर्णी, यशस्वी जयस्वाल, सरफराज खान, आकाशलाल गोमल, भूपेन लालवाणी, अरमान जाफर, प्रयाग भाटी, अखिल हेरवाड, दिवाणकर, दिवाणकर राजपूत, दि. , वैदिक मुकर, चिन्मय सुतार, हशीर दफेदार, जयेश पोखरे, निखिल पाटील (जूनियर), अग्नि चोपडा, गौरीश जाधव, सुहर्ष पारकर, निखिल पाटील (सब ज्युनियर), सिद्धार्थ एकरे, जपजित रंधावा, प्रज्ञाेश कंवर, प्रग्नेश कंवर वरुण लवंडे, अथर्व अकोलेकर, शम्स मुलाणी, सुजित नायक, धरमिल मतकर, आसिफ शेख, वर्षा कोठारी, कुणाल थोरात, सागर मिश्रा, श्रेयस गुरव, विनायक भोईर, विजय गोहिल, यश डिचोलकर, यश चव्हाण, आदित्य धुमाळ, विमल धुराल, प्रसाद पाटील, गौरव जठार , रौनक शर्मा, खिझर दफेदार, प्रशांत सोलंकी, परीक्षित वालसंगकर, परदीप साहू, तनुष कोटियान, शशांक अट्टे, सलमान खान, अंकुश जयस्वाल, अक्षय घोरपडे, कल्पेश सावंत, आकाश पार्क, आकाश पार्क, आकाश पार्क हशेम रंजन, हार्दिक तमोर, प्रसाद पवार , आकाश आनंद, अजिंक्य पाटील, वैभव कळमकर, सिद्धार्थ अदुतराव, अदीब उस्मानी, तुषार देशपांडे, मोहित अवस्थी, रवि सोलंकी, कृती नागावाडी, मीनाद मांजरेकर, प्रथमेश राठोड, अतकेश आठवे अर्जुन तेंडुलकर, अबुल कलाम, रॅस्टन डायस, अकिब कुरेशी, सिद्धार्थ राऊत, दानिश शेख, हृतिक कांबळे, निखिल तिथी, नदीम शेख, अंजदीप लाड, अतीर शेख, दीपक शेट्टी, हर्षा शती, हर्षा. स्वप्निल प्रधान, स्वप्निल प्रधान, परागान खान, रग्गड कुलकर्णी, बदरे आलम, सुफियान शेख, रोहन राजे, विक्रांत ओटी, सचिन यादव.