ETV Bharat / sports

१० हजार धावा ठोकणाऱ्या फलंदाजाला झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतून वगळले - pakistan vs zimbabwe series

मालिकेच्या वेळापत्रकानुसार उभय संघ ३० ऑक्टोबर, १ नोव्हेंबर, ३ नोव्हेंबरला एकदिवसीय सामने खेळणार आहेत. ही एकदिवसीय मालिका वर्ल्डकप सुपर लीगचा एक भाग आहे. वर्ल्डकप सुपर लीगचे पहिले सात संघ २०२३मध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये सहभागी होतील.

shoaib malik out of pakistan team for zimbabwe series
१० हजार धावा ठोकणाऱ्या फलंदाजाला झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेतून वगळले
author img

By

Published : Oct 19, 2020, 4:34 PM IST

लाहोर - पाकिस्तानचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शोएब मलिकला ३० ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले नाही. पाकिस्तानने गेल्या १२ महिन्यांपासून घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिका खेळलेली नाही. आता त्यांना झिम्बाब्वेसमवेत तीन सामन्यांची एकदिवसीय आणि नंतर तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे.

काही दिवसांपूर्वी, पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी क्रिकेटपटू शोएब मलिकने टी-२० क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला. मलिक टी-२० क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार करणारा जगातील पहिला आशियाई आणि तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी ख्रिस गेल आणि कायरन पोलार्ड यांनी हा पराक्रम केला आहे.

मालिकेच्या वेळापत्रकानुसार उभय संघ ३० ऑक्टोबर, १ नोव्हेंबर, ३ नोव्हेंबरला एकदिवसीय सामने खेळणार आहेत. ही एकदिवसीय मालिका वर्ल्डकप सुपर लीगचा एक भाग आहे. वर्ल्डकप सुपर लीगचे पहिले सात संघ २०२३मध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमध्ये सहभागी होतील. त्यानंतर दोन्ही संघ ७, ८ आणि १० नोव्हेंबरला लाहोरमध्ये टी-२० सामने खेळणार आहेत. गेल्या पाच वर्षांत झिम्बाब्वेचा हा दुसरा पाकिस्तान दौरा असेल.

अब्दुल्ला शफीक आणि रोहेल नजीर यांसारख्या युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी पाकिस्तान संघात मलिकची निवड झालेली नाही, असे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) म्हटले आहे. या मालिकेसाठी यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानला बॅकअपसाठी राखून ठेवण्यात आले आहे.

इंग्लंड दौऱ्यासाठी पाकिस्तान संघात भाग घेतलेल्या सरफराज अहमदने या मालिकेमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक आणि निवडकर्ता प्रमुख मिस्बाह-उल-हक म्हणाला, "मलिक आणि सरफराज यांची या मालिकेसाठी निवड झालेली नाही, परंतु त्यांची कारकीर्द अद्याप संपलेली नाही हे मला स्पष्ट करायचे आहे. रणनीती म्हणून निर्णय घेण्यात आला अब्दुल्ला शफीक, हैदर अली आणि खुशदिल शहा यासारख्या खेळाडूंना ही संधी मिळू शकेल."

झिम्बाब्वे मालिकेसाठी पाकिस्तानचा संभाव्य संघ - बाबर आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार), अब्दुल्ला शफीक, आबिद अली, फहीम अशरफ, फखर जमान, हैदर अली, हॅरिस रऊफ, हॅरिस सोहेल, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम. , इमाम उल-हक, खुशदिल शाह, मोहम्मद हाफिज, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिजवान, मूसा खान, रोहेल नजीर, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान कादीर, वहाब रियाज आणि जफर गोहर.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.