ETV Bharat / sports

'मला खात्री आहे, सरफराजला संघाबाहेर हाकलतील', शोएब अख्तरचा दावा - sarfaraz out from pakistan team

बाबर आझमला टी-२०चे कर्णधारपद देण्यात आले आहे. टी-२० क्रिकेटमधील फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत बाबर आझम पहिल्या स्थानावर विराजमान आहे.

'मला खात्री आहे, सरफराजला संघाबाहेर हाकलतील',  शोएब अख्तरचा दावा
author img

By

Published : Oct 19, 2019, 2:49 PM IST

कराची - सरफराजला संघाच्या कर्णधारपदावरून काढल्यानंतर तो संघामध्येही राहणार नाही, असे मत पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने म्हटले आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या टी-२० आणि कसोटी संघाचे कर्णधार नेमले आहेत. या दौऱ्यासाठी सरफराज अहमदची टी-२० आणि कसोटी संघांच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.

हेही वाचा - प्रो कबड्डी - पहिल्या विजेतेपदासाठी दिल्ली आणि बंगाल भिडणार

'मला माहित होते सरफराजसोबत असे होणार आहे आणि याला तोच कारणीभूत आहे. कामगिरीत सुधारणा कर असे मी त्याला दोन वर्षांपासून सांगत होतो. मला खात्री आहे, या घटनेशिवाय, सरफराजला संघाबाहेर करतील. त्याला संघ परत संधी देणार नाही. त्याच्या कर्णधापदाच्या काळात आत्मविश्वास कधीच जाणवला नाही', असे मत शोएब अख्तरने मांडले आहे.

पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व सरफराजकडेच राहणार का हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, कसोटी संघाचे कर्णधारपद अझहर अलीकडे सोपवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, प्रशिक्षक मिसबाह उल हकने सरफराज अहमदचे कर्णधारपद काढून घेण्यात यावे, अशी शिफारस पीसीबीला केली होती. तेव्हाच सरफराजचे कर्णधारपद धोक्यात आले होते.

Intro:Body:

'मला खात्री आहे, सरफराजला संघाबाहेर हाकलतील',  शोएब अख्तरचा दावा

कराची - सरफराजला संघाच्या कर्णधारपदावरून काढल्यानंतर तो संघामध्येही राहणार नाही असे मत पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने म्हटले आहे. आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या टी-२० आणि कसोटी संघाचे कर्णधार नेमले आहेत. या दौऱ्यासाठी सरफराज अहमदची टी-२० आणि कसोटी संघांच्या कर्णधारपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे.

हेही वाचा -

'मला माहित होते सरफराजसोबत असे होणार आहे आणि याला तोच कारणीभूत आहे. कामगिरीत सुधारणा कर असे मी त्याला दोन वर्षांपासून सांगत होतो. मला खात्री आहे, या घटनेशिवाय, सरफराजला संघाबाहेर करतील. त्याला संघ परत संधी देणार नाही. त्याच्या कर्णधापदाच्या काळात आत्मविश्वास कधीच जाणवला नाही', असे मत शोएब अख्तरने मांडले आहे.

पाकिस्तानच्या एकदिवसीय संघाचे नेतृत्व सरफराजकडेच राहणार का हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र, कसोटी संघाचे कर्णधारपद अझहर अलीकडे सोपवण्यात आले आहे. पाकिस्तानच्या एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, प्रशिक्षक मिसबाह उल हकने सरफराज अहमदचे कर्णधारपद काढून घेण्यात यावे, अशी शिफारस पीसीबीला केली होती. तेव्हाच सरफराजचे कर्णधारपद धोक्यात आले होते.

बाबर आझमला टी-२०चे कर्णधारपद देण्यात आले आहे. टी-२० क्रिकेटमधील फलंदाजांच्या जागतिक क्रमवारीत बाबर आझम पहिल्या स्थानावर विराजमान आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.