ETV Bharat / sports

'भारतीय गोलंदाज माझ्याकडून सल्ला घेतात, पण पाकचे खेळाडू घेत नाही' - शोएब अख्तर विषयी बातम्या

शोएब अख्तरने आपल्या युट्यूब चॅनलवर ही खंत बोलून दाखवली आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजांना मदत करण्यासाठी मी नेहमीच उपलब्ध आहे, ते माझ्याशी संपर्क करू शकतात. पण कोणताही गोलंदाज सल्ला घ्यायला येत नाही. उलट मोहम्मद शमीसारखे भारतीय गोलंदाज मला फोन करून मदत मागतात. माझ्या देशासाठी मला वाईट वाटतं, असे शोएब म्हणाला.

शमी सल्ला मागतो पण पाकचे गोलंदाज नाही, शोएबने व्यक्त केली खंत
author img

By

Published : Oct 8, 2019, 9:10 PM IST

नवी दिल्ली - भारतीय गोलंदाज माझ्याकडून सल्ला घेतात, पण पाकिस्तानचे गोलंदाज सल्ला घ्यायला येत नाहीत, अशी खंत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने व्यक्त केली. सध्या श्रीलंकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर असून, सुरू असलेल्या टी-२० मालिकेत लंकेने पाकिस्तानचा २-० ने पराभव करत विजयी आघाडी घेतली आहे. बऱ्याच कालावधीनंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यात येत आहेत. मात्र, यात पाकचा पराभव झाल्याने, माजी खेळाडूंसह चाहत्यांनी खेळाडूंना धारेवर धरले आहे.

शोएब अख्तरने आपल्या युट्यूब चॅनलवर ही खंत बोलून दाखवली आहे. पाकिस्तानच्या गोलंदाजांना मदत करण्यासाठी मी नेहमीच उपलब्ध आहे, ते माझ्याशी संपर्क करु शकतात. पण कोणताही गोलंदाज सल्ला घ्यायला येत नाही. उलट मोहम्मद शमीसारखे भारतीय गोलंदाज मला फोन करुन मदत मागतात. माझ्या देशासाठी मला वाईट वाटतं, असे शोएब म्हणाला.

दरम्यान, शोएब अख्तरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मोहम्मद शमीने केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. तसेच त्याने शमीकडे स्विंगची कला असून तो भविष्यात रिव्हर्स स्विंगचा बादशाह होऊ शकतो, असे भाकितही वर्तवले आहे.

आयसीसी विश्वकरंडकानंतर शमीने मला फोन केला होता. भारतासाठी चांगली कामगिरी न झाल्याचे शमीला वाईट वाटत होते. पण मी शमीला आशा सोडू नकोस आणि फिटनेसवर लक्ष दे. तुला आता मायदेशात मालिका खेळायची असून यात चांगली कामगिरी कर असा सल्ला दिला असल्याचे शोएबने सांगितले. दरम्यान, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शमीने ५ विकेट घेतल्या. यातल्या ४ विकेट तर शमीने त्रिफाळाचीत करत घेतल्या होत्या.

हेही वाचा - एकट्यानं सामना जिंकता येत नाही, पाक प्रशिक्षकांनी सुनावले खडेबोल

हेही वाचा - सामन्यावेळी मैदानावरच पंचाचा मृत्यू, कसाई ते पंच असा होता प्रवास

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.